शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 9:55 PM

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. मात्र मागील वर्षीे केवळ सरासरीच्या ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. यावर्षी तापमानातही प्रचंड वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर होत आहे. भूजल सर्वेक्षण व जि.प.पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात केलेल्या तीसºया टप्प्याच्या सर्वेक्षणात भूजल पातळीत एक ते दीड मीटरने घट झाली असल्याचे आढळले.परिणामी विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी अंत्यत खोल गेली आहे. तर काही गावातील विहिरी आणि बोअरवेल सुध्दा कोरड्या पडल्याने गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची भल्या पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.जि.प.पाणी पुरवठा विभागाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यानचा एकूण ३९८ गावांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १२६ गावे आणि २६ वाड्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे.या गावांमधील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध उपाय योजनांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात १३६ नवीन बोअरवेलचे खोदकाम, ३६ गावातील नळ योजनांची दुरूस्ती, ९६२ बोअरवेलची दुरूस्ती, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १९ गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एकूण १५४० उपाय योजना राबविण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या उपाय योजना राबविण्यास जि.प.पाणी पुरवठा विभागाने सुरूवात केली नाही. त्यामुळे गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.उपाययोजना कागदावरचजिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर दुसरीकडे जि.प.पाणी पुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्याचा दावा करीत आहे.मात्र गावकºयांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.चार दिवसानंतर सोडणार पाणीगोंदिया शहरवासीयांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सोमवारी (दि.१५) महाराष्टÑ जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाची पाहणी केली. त्यानंतर चार दिवसांनी पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत सोडले जाणार आहे.पाच कोटी रुपयांची तरतूद पण खर्च किती?जिल्हा प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र अद्यापही बºयाच गावांमधील बोअरवेल आणि नळ योजना बंद पडल्या आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपैकी नेमका किती निधी आतापर्यंत खर्च करण्यात आला याची माहिती मात्र या विभागाकडे नाही.ग्रामीण भागासह शहरवासीयांवर संकटजिल्ह्यातील केवळ ग्रामीण भागावरच पाणी टंचाईचे संकट नसून गोंदिया शहरावर सुध्दा पाणी टंचाईचे संकट कायम आहे. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाºया डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ चार दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चार दिवसानंतर शहरवासीयांना सुध्दा पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई