शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन मतदारसंघात १४ मजूर रिंगणात; पक्षांचा डावपेच की प्रामाणिक उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:28 IST

Gondia : गोंदिया व तिरोडा विधानसभा संघातील चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघातून एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी तब्बल १४ मजुरांनी आपला व्यवसाय हा शेती व मजुरी असल्याचे निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. एकीकडे निवडणूक लढविणे आता सोपे राहिले नाही असे म्हटले जात असतानाच शेती आणि मजुरी करणाऱ्या १४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये दोन विद्यमान आमदारांच्या वर्चस्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांच्या विरोधात दमदार उमेदवार असून गोंदियात माजी आमदार तर तिरोडात माजी आमदारांचे पुत्र लढाईत आहेत. हे चारही उमेदवार कोट्यधीश आहे. ते आपले राजकीय कसब वापरुन निवडणूक लढवित आहेत. यात शंकाच नाही; मात्र निवडणुकीत लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे या जोरावर एक-दोन नव्हे तर तब्बल १४ मजूर रिंगणात उतरले आहेत. 

यामध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एक तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १३ मजूर रिंगणात आहेत. यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे. 

हे आहेत रिंगणातील उमेदवार आपला व्यवसाय शेती व मजुरी दाखवून रिंगणात उतरलेल्या उमे- दवारांमध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातील राजेश हनवतलाल डोये यांचा तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून चंपालाल दशरथ साठवणे, दिनेश दुधराम टेकाम, राजेंद्र दिलीप सोयम, राजेश माधोराव आंबेडारे, अजय विश्वनाथ अंजनकर, खुशाल देवाजी कोसरकर, कैलाश बुधराम गजभिये, राजेश मयाराम तायवाडे, गणपत डुलीचंद रहांगडाले, निरज भूमेश्वर मिश्रा, निलेश प्रदीप रोडगे, राजेंद्र दामोदर बोंदरे व सोनू रमेश टेंभेकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया