१३४ मंडळांनी घेतली जोडणी

By Admin | Updated: September 21, 2015 01:37 IST2015-09-21T01:37:40+5:302015-09-21T01:37:40+5:30

अवैधरित्या घेतलेल्या वीज चोरीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता पुढाकार घेतला आहे.

134 Connect with the churches | १३४ मंडळांनी घेतली जोडणी

१३४ मंडळांनी घेतली जोडणी

देवरी तालुका आघाडीवर : शहरात ३४ मंडळाचे अर्ज
गोंदिया : अवैधरित्या घेतलेल्या वीज चोरीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता पुढाकार घेतला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील १३४ मंडळांनी वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले असून त्यांना जोडणी देण्यात आली आहे. यात देवरी तालुका आघाडीवर असून ७८ कनेक्शन देण्यात आले आहेत. शिवाय गोंदिया शहरातील ३४ मंडळांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे आल्याचे कळले.
जिल्ह्यात हजारांच्या घरात सार्वजनीक मंडळांकडून गणपतीची स्थापना करण्यात आली. यात देखावे व रोशनाईवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. उत्सवाच्या या थाटामाटात मात्र वीज चोरी करून पैसे वाचविण्याचा पराक्रम काही मंडळ करतात. कित्येकदा वीज चोरीच्या या प्रकारातून काही अपघात व अप्रिय घटना घडतात. लहानशा चुकीमुळे अख्ख्या उत्सवावर विरजण पडते.
उत्सवाच्या काळात हे सर्व प्रकार टळावे व निर्विघ्न उत्सव साजरा व्हावा यासाठी वीज मंडळाकडून सवलतीच्या दरात वीज जोडणी दिली जाते. शिवाय जनजागृतीच्या माध्यमातूनही मंडळांना जागृत केले जाते. तसेच वीज चोरीवर आळा बसावा यासाठी वीज वितरण कंपनीचे भरारी पथक व दामिनी पथक तपासणी मोहीम राबवून कारवाया करतात. त्यानुसार यंदाही वीज वितरण कंपनीकडू सवतलीच्या दरात वीज जोडणी दिली जात असून मंडळांना वीज जोडणीसाठी आवाहन करण्यात आले.
याचे फलीत असे की, जिल्ह्यातील १३४ मंडळांनी वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीला अर्ज दिले असून त्यांना अधिकृत वीज जोडणी देण्यात आली आहे. यात देवरी विभागात ७८ मंडळांनी वीज घेतली असून आतापर्यंत तरी देवरी विभाग वीज जोडणी घेण्यात आघाडीवर आहे. तर गोंदिया विभागात ५६ मंडळांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. यात ३४ अर्ज गोंदिया शहरातून असल्याची माहिती विद्युत विभागाने दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 134 Connect with the churches