१३,१६७ मतदार बजावणार हक्क

By Admin | Updated: May 29, 2016 01:56 IST2016-05-29T01:56:00+5:302016-05-29T01:56:00+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२९) मतदान होणार आहे. यासाठी मतदानाच्या हालचाली सुरू झाल्या असून ....

13,167 voters right to vote | १३,१६७ मतदार बजावणार हक्क

१३,१६७ मतदार बजावणार हक्क

आज पोटनिवडणूक : उद्या होणार मतमोजणी
गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२९) मतदान होणार आहे. यासाठी मतदानाच्या हालचाली सुरू झाल्या असून शनिवारी (दि.२८) कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या निवडणुकीत प्रभागातील १३ हजार १६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र रिक्त झालेली ही जागा आपल्याकडे खेचून काढण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोर लावला आहे. यामुळेच प्रभागात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनाही प्रचारासाठी जोर लावल्याचे दिसून आले. यामुळेच अवघ्या शहराचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रविवारी (दि.२९) या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यात प्रभागातील १३ हजार १६७ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालात ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ४, सरस्वती महिला विद्यालयात २ व नमाद महाविद्यालयात ३ मतदान केंद्र देण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण १३ इलेक्ट्रॉनिक मशिन्सवर हे मतदान घेतले जाणार आहे.
मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.३०) हिंदी टाऊन शाळा परिसरातील स्वर्ण जयंती कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतदानासाठीच्या या तयारीला शनिवारी (दि.२८) सुरूवात झाली व स्वर्ण जयंती कार्यालयातून कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातील प्रभागासाठी शहरातीलच शाळांचे केंद्र ठेवण्यात आल्याने सर्वच केंद्रांना संवेदनशील गृहीत धरून त्यांच्यावर चोख पोलीस बंदोबस्त व त्यानुसार व्यवस्था करण्यात आल्याचे प्रभागी मुख्याधिकारी व अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
१३ मतदान केंद्रांवरून होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ६५ कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. यात एका केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष व चार मतदान अधिकारी राहतील. हे कर्मचारी आमगाव व देवरी तालुक्यातील असून यांत शिक्षक, पंचायत समिती व राज्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय नगर परिषदेचे कर्मचारी वेगळे असून पोलीस बंदोबस्तही वेगळा आहे.

न.प. क्षेत्रातील मद्यविक्र ी बंद
नगर परिषदेच्या प्रभाग क्र मांक १ मधील पोटनिवडणूकीसाठी २९ मे रोजी मतदान होणार आहे. ३० मे रोजी सकाळी १० वाजता स्वर्णजयंती कार्यालय, नगरपरिषद टाऊन शाळा येथे मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून तसेच निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी या उद्देशाने मतदानाच्या आधीचा संपूर्ण दिवस, २९ व ३० मे रोजी मतमोजणी संपेपर्यंत नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारची परवानाधारक मद्यविक्र ीची दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या परवानाधारकाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले.

Web Title: 13,167 voters right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.