१३ हजार ६११ बालके घेणार शाळाप्रवेश
By Admin | Updated: March 28, 2017 00:48 IST2017-03-28T00:48:40+5:302017-03-28T00:48:40+5:30
गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये अंमलबजावणी होत आहे.

१३ हजार ६११ बालके घेणार शाळाप्रवेश
गुढी पाडवा, प्रवेश वाढवा उपक्रम : शिक्षण विभाग उभारणार प्रवेशाची गुडी
गोंदिया : गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये अंमलबजावणी होत आहे. पुढच्या सत्रासाठी १३ हजार ६११ बालकांना प्रवेश देऊन प्रवेशाची गुढी उभारली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सुसज्य शाळांमध्ये मंगलमय शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक मुल शिकावे व टिकावे यासाठी शिक्षण विभागातील यंत्रणेमार्फत नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील १०० टक्के शाळा डिजीटल करण्यात येत आहेत. याचाच परिणाम खासगी शाळातील विद्यार्थी आता जि.प. शाळाकडे वळत आहेत. सन २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासन निर्णयानुसार २६ जून २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या पटनोंदणी पंधरवाड्याची वाट न पाहता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालक-शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्या मदतीने बालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मागील वर्षी या उपक्रमा दरम्यान एकाच दिवशी १० हजार बालकांना प्रवेश देण्यात आला होता. नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आले होते. यंदा आमगाव तालुक्यातील ११६ शाळांमध्ये १४५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३८ शाळांमध्ये १७३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. देवरी तालुक्यातील १४४ शाळांमध्ये १८८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. गोंदिया तालुक्यातील १८८ शाळांमध्ये ३०८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. गोरेगाव तालुक्यातील १०९ शाळांमध्ये १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ११५ शाळांमध्ये १५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे.
सालेकसा तालुक्यातील १२० शाळांमध्ये ९४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. तिरोडा तालुक्यातील १३९ शाळांमध्ये १४१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये १३ हजार ६११ बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
गोड पदार्थाने होणार स्वागत
‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाची सुरुवात गावात प्रवेश दिंडी काढून करण्यात येणार आहे. गावातील जि.प. शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ, भेटवस्तू व गोड पदार्थ देऊन केले जाणार आहे. पाटी-पेन्सील, वही देऊन मध्यान्ह भोजनातही गोड पदार्थ देण्याच्या सुचना मुकाअ डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांनी दिल्या आहेत.
गुढीपाडव्याला प्रवेशाची गुढी उभारण्याचा मानस
शिक्षण विभागाचा आहे. गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा उपक्रम आहे.
- उल्हास नरड
प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद, गोंदिया