शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

‘त्या’ १३ मजुरांनी पायीच गाठले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.

ठळक मुद्देअसह्य वेदना मात्र गावाची ओढ : स्वत:च्या घरात अलगीकरण, लॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी (पिंपळगाव) येथील मजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी १३ मजूर नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात वीस दिवसांपूर्वी गेले होते. अशातच लॉकडाऊन करून संचारबंदी करण्यात आली. गावाला परत कसे जाणार याची चिंता त्यांना सतावू लागली. कुटुंबाच्या आठवणीने मन विचलीत होऊ लागले. अशात त्या १३ मजुरांनी संकल्प करून रविवारला (दि.५) पहाटे ३ वाजता परसाळ (गुंथारा) गावातून स्वगावी येण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. रात्रंदिवस पायी चालून सोमवारी त्यांनी आपले गाव गाठले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी येथील मजूर गावात रोजगार नाही म्हणून काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील परसाळ (गुंथारा) येथे गहू कापणीच्या कामासाठी गेले होते.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १३ मजूर गाव सोडून शेकडो किमी अंतरावर राबण्यासाठी गेले होते. गावातून गेलेल्या त्या मजुरांनी त्या ठिकाणी काही दिवस गहू कापणीचे काम सुद्धा केले.अशातच जिवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करून संचारबंदी करण्यात आली. शासनाने जिथे आहात तिथेच थांबा असे आदेश सर्वत्र धडकले. कोरोना विषाणूची अनेकांनी चांगलीच धास्ती घेतली. खांबीवरून रोजगारासाठी गेलेल्या त्या १३ मजुरांना घराची ओढ लागली. मुलाबाळांच्या भवितव्याची चिंता मनोमन सतावू लागली. काही झाले तरी आता आपण आपल्या गावाला जावून कुटुंबासोबत राहायचे असा त्यांनी संकल्प केला. मौदा तालुक्यातील परसाळ या गावावरून रविवारी (दि.५) पहाटे ३ वाजता आपले सामान डोक्यावर घेऊन गावाला येण्यासाठी पायी-पायीच निघाले.पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.सावरबांधच्या बस स्थानकात त्यांनी थोडा विश्रांती घेतली. सोमवारी (दि.५) पहाटेच्या ४ वाजता चान्ना बाक्टी या गावात त्यांनी प्रवेश केला.या सर्व १३ मजुरांची नोंदणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी करून त्यांची प्राथमिक तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला. लोकमत प्रतिनिधीने खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटिल नेमीचंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधून त्या मजुरांना गावी नेण्यासाठी व्यवस्था करण्यासंबधी चर्चा केली. सकाळी १० वाजता त्यांनी स्वगावी खांबी येथे नेवून जि.प.शाळेत तात्पुरती व्यवस्था करून त्या सर्वांना जेवण दिले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी सुद्धा भेट देऊन त्यांना घराबाहेर निघू नका असा हितोपदेश केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या