१३ झाले बरे, तर १२ बाधितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:26+5:302021-02-05T07:45:26+5:30

गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ...

13 became better, while 12 more fell | १३ झाले बरे, तर १२ बाधितांची पडली भर

१३ झाले बरे, तर १२ बाधितांची पडली भर

गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नव्हती, तर शनिवारी १३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली व १२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यात शनिवारी १२ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. यात सर्वाधिक ९ कोरोनाबाधित गोंदिया तालुक्यातील आहे. आमगाव १, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात ६५ हजार २४३ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५३,६३४ नमुने निगेटिव्ह आले. काेरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६५,३१७ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५९,२१६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४१८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यापैकी १३८७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १२७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १२ स्वॅब नमु्न्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

Web Title: 13 became better, while 12 more fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.