१२ हजार रुपयाची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST2021-04-14T04:26:23+5:302021-04-14T04:26:23+5:30

गोंदिया : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून सातत्याने धाडसत्र राबवून दारू जप्त केली जात आहे. अशात आता ...

12,000 worth of liquor was seized | १२ हजार रुपयाची दारू पकडली

१२ हजार रुपयाची दारू पकडली

गोंदिया : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून सातत्याने धाडसत्र राबवून दारू जप्त केली जात आहे. अशात आता शहर पोलिसांनीही शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांना दणका देत त्यांच्याकडील ११ हजार ६०२ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.

यामध्ये पहिल्या कारवाईत शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गुरुनानक वॉर्डातील पाणी टाकी जवळील छाया रामसिंग चव्हाण (५६) ही महिला आपल्या घरी देशी दारू विक्री करीत असताना धाड घालून तिच्या घरातून ८३२ रुपये किमतीची दारू पोलीस शिपाई सोनवणे यांनी जप्त केली. दुसऱ्या कारवाईत झोपडी मोहल्ला यादव चौकातील सलीम रफीक शेख (३५) याच्या घरातून सहा हजार ५४० रुपयाची देशी-विदेशी दारू पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी जप्त केली. तिसऱ्या कारवाईत गंज बाजार चौक येथे आरोपी समीर बद्रीनारायण जयस्वाल (२६) याच्या घरातून एक हजार ९५० रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तर चौथ्या कारवाईत गंज बाजार चौकातीलच नीरज प्रयागलाल जायस्वाल (५०) याच्याकडून दोन हजार २८० रुपये किमतीची विदेशी व बीअर जप्त करण्यात आली. अशाप्रकारे शहर पोलिसांनी या कारवाईतून ११ हजार ६०२ रुपये किमतीची देशी-विदेसी दारू जप्त केली आहे. आरोपींविरुद्ध शहर पोलिसात मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) ७७ (अ) सहकलम भादंवि कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 12,000 worth of liquor was seized