१२ हजार ५५२ विद्यार्थी देणार आज शिष्यवृत्तीची परीक्षा
By Admin | Updated: February 26, 2017 00:32 IST2017-02-26T00:32:49+5:302017-02-26T00:32:49+5:30
जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ५५२ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

१२ हजार ५५२ विद्यार्थी देणार आज शिष्यवृत्तीची परीक्षा
गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ५५२ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि.२६ रोजी जिल्ह्यातील ९७ केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयारी केली असून ठिकठिकाणी केंद्राधिकारी व शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांचे मिळून वर्ग पाचवीचे ६ हजार ९१४ विद्यार्थी ५२ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. तसेच वर्ग आठवीचे ५ हजार ६३८ विद्यार्थी ४५ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत.
सकाळी १०.३० पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. यात इयत्ता पाचवीकरिता प्रथम भाषा / गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी तर इयत्ता आठवीकरिता प्रथम भाषा/ख़णित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी असे परीक्षेतील विषय राहणार आहेत. एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका राहणार आहे. पहिल्या पेपरची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तर दुसऱ्या पेपरची वेळ दुपारी १.३० ते ३ पर्यंत राहील. इयत्ता आठवीसाठी २० टक्के प्रश्नांच्या चार पर्यायांपैकी २ पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवावे लागणार आहे. दोन्ही अचूक पर्याय न नोंदविल्यास शून्य गुण दिले जाणार आहे.
तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या पाहता सर्वाधिक विद्यार्थी गोंदिया तालुक्यातील असून २७ केंद्रांवरून ते परीक्षा देणार आहेत. यात पाचवीचे २२५० तर आठवीचे २११७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाचवीचे ८१९ तर आठवीचे ५९७ विद्यार्थी, सडक अर्जुनीत पाचवीचे ६२० तर आठवीचे ३८३, गोरेगावात पाचवीचे ८८८ तर आठवीचे ६४८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)