१२ शिक्षक, ६५ विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 6, 2015 01:48 IST2015-09-06T01:48:20+5:302015-09-06T01:48:20+5:30

शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनी घेण्यात आला.

12 teachers, 65 students felicitated | १२ शिक्षक, ६५ विद्यार्थ्यांचा सत्कार

१२ शिक्षक, ६५ विद्यार्थ्यांचा सत्कार

मान्यवरांची उपस्थिती : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
गोंदिया : शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनी घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ६५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावळे, अतिथी म्हणून शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, सुरेश हर्षे, शोभेलाल कटरे, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, रजनी कुंभरे, उषा शहारे, हमिद अकबर अली, रजनी गौतम, लता दोनोडे, माधुरी पाथोडे, गिरीषकुमार पालीवाल, राजेश भक्तवर्ती, सिमा मडावी, प्रिती रामटेके, अरविंद रामटेके, प्राथमिक शिक्षणाधिकारी जी.एन. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.बी. खंडागडे, उपशिक्षणाधिकारी एल.एम. मोहबंशी, एल.आर.गजभिये, ए.एम. फटे उपस्थित होते.
अतिथींच्या हस्ते प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून अनिरूध्द श्रावण मेश्राम जि.प. पुर्व माध्यमिक शाळा नागरा (मुली), गोरेगाव तालुक्यातून सूर्यकांता आत्माराम हरिणखेडे जि.प. वरिष्ट प्राथमिक शाळा सर्वाटोला, तिरोडा तालुक्यातून महिपाल रामाजी पारधी जि.प. प्राथमिक शाळा पुजारीटोला, सडक-अर्जुनी तालुक्यातून भाष्कर हिरामान नागपुरे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा डव्वा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून पुनाराम नत्थू जगझापे जि.प.वरिष्ट प्राथमिक शाळा गवर्रा, देवरी तालुक्यातून दीपक मोतीराम कापसे जि.प. प्राथमिक शाळा शेडेपार, सालेकसा तालुक्यातून रणजीतसिंह लालसिंह मच्छीरके जि.प. हिंदी वरिष्ट प्राथमिक शाळा खोलगड, आमगाव तालुक्यातून कुवरलाल तेजराम कारंजेकर जि.प. वरिष्ट प्राथमिक शाळा ठाणा, सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार आमगाव तालुक्याताील दिक्षा महादेव फुलझेले केंद्र वरिष्ट प्राथमिक शाळा अंजोरा यांना देण्यात आला.
माध्यमिक विभागातून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राजेंद्र आत्माराम बावणकर जि.प. हायस्कूल नवेगावबांध, देवरी तालुक्यातून रविंद्र दौलत मेश्राम जि.प. हायस्कूल ककोडी, सालेकसा तालुक्यातून विनोद शालीकराम झोडे जि.प. हायस्कूल साखरीटोला यांना देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे म्हणाल्या, जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शिक्षकांच्या सहभागाशिवाय हे काम अशक्य आहे. शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडविण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राथमिक शिक्षणाधिकारी जी.एन. पाटील यांनी केली. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शरद काथवटे यांच्या बेसीक मेथोमेटिकल कॉन्सेप्ट या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलकंठ सिरसाटे, विजय ठोकने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले
चौथ्या वर्गात तालुक्यातून प्रथम ठरलेल्या विद्यार्थ्यांत सडक अर्जुनी तालुक्यातून निशा वंजारी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातून अमन मेश्राम, देवरी राजनंदनी नेताम, तिरोडा राधेशाम लिल्हारे, गोंदिया निखील पराते, गोरेगाव वैदावी कनोजे, आमगाव आशिक हत्तीमारे, सालेकसा पृथ्वीराज उके, सातवीतून सडक अर्जुनी मनीषा हत्तीमारे, अर्जुनी मोरगाव प्रवीण शहारे, देवरी नरेंद्रकुमार नेताम, तिरोडा प्राची बिसेन, गोंदिया सक्षम पारधी, गोरेगाव भावना पंधराम, आमगाव पायल भोेंडेकर, सालेकसा संगिता चौधरी. राष्ट्रीय स्तरावर चौथ्या वर्गातून मेरीटमध्ये आलेले सडक अर्जुनी तालुक्यातील १० विद्यार्थी त्यात वैष्णवी गहाणे, राहुल मेंढे, रितेश कापगते, मोहनिश डोंगरवार, पुनम डोंगरवार, काजल तरोणे, धनश्री लंजे, दुर्गेश कापगते, चेतन ठाकरे, लक्की चांदेवार. दहावीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या बनाथर येथील सोनाली कोल्हटकर, दवनीवाडा येथील ज्योती बाळणे, काटी येथील वैभव बिसेन, एकोडी येथील शेमंत पटले, परसवाडा कल्पना धांडे, करटी (बुज.) महेश चौधरी, तिरोडा ममता रहांगडाले, सुकडी विरेंद्र बागडे, वडेगाव हिमांशू बिसेन, गांगला निकिता बिसेन, साखरीटोला उद्देश चौरागडे, कावराबांधी आशिष उपराडे, सौंदड पायल जांभुळकर, सडक अर्जुनी पायल फुलवजे, ककोडी उर्वशी सोनगोई, आमगाव निलेश नान्हे, कट्टीपार तुषार हर्षे, गोरेगाव अमोल अगळे, अर्जुनी मोरगाव केवील इरले, नवेगावबांध सागर धनगाये, बोंडगावदेवी निलम हेमणे, बारावीतून दवनीवाडा येथील रजनी मिश्रा, काटी आशिफ सैय्यद, एकोडी सुधा पटले, अतुल पताहे, दवनीवाडा आरती हिवारे, परसवाडा सत्यभान सोनवाने, तिरोडा निशा प्रजापती, सुकडी निशा बावनथडे, वडेगाव सुजाता रहांगडाले, कावराबांध मिना वट्टी, सडक अर्जुनी आकाश साखरे, देवरी भूमेश्वरी चौधरी, आमगाव दिव्या परिहार, गोरेगाव राहुल कटरे, अमिता बघेले, अर्जुनी मोरगाव प्रणय मेश्राम, वैभव काळबांधे व नवेगावबांध येथील सचिन रोकडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 12 teachers, 65 students felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.