१२ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 21, 2014 23:53 IST2014-09-21T23:53:57+5:302014-09-21T23:53:57+5:30
जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड घालून १२ विक्रेत्यांना गुरूवारी अटक केली.

१२ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड घालून १२ विक्रेत्यांना गुरूवारी अटक केली.
आमगाव पोलिसांनी मानेगाव येथील ईश्वरदास होलीराम तिरपुडे (५५) याचकडून पाच देशी दारूचे पव्वे, ठाणा येथील शोभाराम मिनाराम उके (४२) याचकडून सहा नग देशी दारूचे पव्वे, टाकरी येथील राधेलाल बाबुलाल बिसेन (३९) व सितेपार येथील गोरेलाल मनिराम चौधरी (४५) या दोघांजवळून १० हजार ७२५ रुपयाची इंग्रजी दारू व एमएच ३४/डब्ल्यु-१३८६ ही मोटारसायकल जप्त केली. मोटारसायकलची किंमत २० हजार रुपये सांगीतली जाते. या प्रकरणात पोलिसांनी ३० हजार ७२५ रुपयाचा माल जप्त केला आहे. गोंदिया शहर पोलिसांनी फुलचूरच्या सहायता नगरातील विनायक परसराम सिडाम (३५) याचकडून १५ लिटर मोहफुलाची दारू, सहा नग देशी दारूचे पव्वे जप्त केले. गंगाझरी पोलिसांनी जुनेवानी येथील अंबिलाल ब्रिजलाल मरस्कोल्हे (४१) याचकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, सहारवाणी येथील रुपचंद उर्फ शिवा दुधा राऊत (४८) याचकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, तिरोडा पोलिसांनी सुकडी येथील देवराम नारायण शेंडे (४७) याचकडून ५० लिटर हातभट्टीची दारू, २० पोत्यांमध्ये मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य असा १३ हजार ११० रुपयाचा माल, तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील शकुंतला कुवरलाल बिंझाडे (६०) या महिलेकडून १० लिटर हातभट्टीची दारू, अकिल खा रहिम खा पठाण (४२) याचकडून ५० लिटर हातभट्टीची दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा ७ हजार ८०० रुपयाचा माल जप्त केला.
रावणवाडी पोलिसांनी राजेश रुपलाल लिल्हारे (३३) रा. रावणवाडी याचकडून ८ देशी दारूचे पव्वे जप्त केले. डुग्गीपार पोलिसांनी सिंदीपार येथील हेमराज केवटराम रामटेके (३६) याचकडून चार देशी दारूचे पव्वे जप्त केले. सदर बाराही आरोपीवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)