जिल्ह्यात ११.५४ लाख हिंदू
By Admin | Updated: August 28, 2015 01:50 IST2015-08-28T01:50:24+5:302015-08-28T01:50:24+5:30
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सन २०११ च्या धर्मआधारीत जनगणनेनुसार जिल्ह्यात ११ लाख ५३ हजार ८६१ हिंदूंची लोकसंख्या असून ते प्रथम क्रमांकावर आहेत,

जिल्ह्यात ११.५४ लाख हिंदू
दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध : सन २०११ च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर
कपिल केकत ल्ल गोंदिया
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सन २०११ च्या धर्मआधारीत जनगणनेनुसार जिल्ह्यात ११ लाख ५३ हजार ८६१ हिंदूंची लोकसंख्या असून ते प्रथम क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध असून त्यांची लोकसंख्या एक लाख २५ हजार २८२ आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या लोकसंख्येत जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण १.१८ टक्के आहे.
जिल्ह्यातील धर्मआधारीत जनगणनेची आकडेवारी बघावयाची झाल्यास जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळांवरही हिंदू लोक संख्या सर्वाधिक दिसून येते. तर दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध लोकसंख्या असून तिसऱ्या क्रमांकावर मुस्लीम लोकसंख्याच दिसून येत आहे.
२००१ मध्येही हिंदूच सर्वाधिक
सन २००१ च्या लोकसंख्येनुसार १२ लाख ७०७ लोकसंख्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या हिंदूचीच नोंदविण्यात आली होती. १० लाख ४१ हजार ८०२ एवढी लोकसंख्या असलेला हिंदू वर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता. तर बौद्ध धर्मीयांची एक लाख १९ हजार ६१८ एवढी लोकसंख्या असून ते दुसऱ्या क्रमांकावर होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती. तर सन २००१ च्या लोकसंख्येनुसार जिल्ह्याची लोकसंख्या राज्याच्या १.२४ टक्के प्रमाणात होती. तसेच सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची १९९१ च्या तुलनेत १०.५४ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.