१.१४ कोटींची अफरातफर, सहा जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 24, 2016 00:04 IST2016-07-24T00:04:28+5:302016-07-24T00:04:28+5:30

कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी पोलिसांनी मेसर्स अ‍ॅग्रो फ्रे शफूड आयएनसी आमगाव या फर्म मधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

1.14 crore FIRs, 6 FIRs filed against | १.१४ कोटींची अफरातफर, सहा जणांवर गुन्हा दाखल

१.१४ कोटींची अफरातफर, सहा जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी पोलिसांनी मेसर्स अ‍ॅग्रो फ्रे शफूड आयएनसी आमगाव या फर्म मधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आमगाव येथील मेसर्स अ‍ॅग्रो फ्रेशफूड आयएनसी या फर्म मधील पार्टनर असलेल्या लोकांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे एक कोटी १३ लाख ८९ हजार २७४ रूपये ६१ पैशांची अफरातफर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या संदर्भात म्हाडाचे माजी सभापती नरेश अमृतलाल माहेश्वरी (६१), विष्णु राजेंद्र माहेश्वरी (३५), आशिक चंपालाल भूतडा (३९), आनंद चंपालाल भूतडा (३२, मे अ‍ॅग्रो फ्रेशफुड आयएनसी सर्व रा. आमगाव) व विकास मोहनलाल बनकदीया (५५,रा.गणेशनगर,गोंदिया) यांन ३० सप्टेंबर २०१४ पासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांचे सदर पैसे हडपल्याची तक्रार जयप्रकाश नतमल भट्टड (५०,रा.विद्यानगरी,आमगाव) यांनी पोलिसांकडे केली आहे.
बॅलेन्सशीटमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे इतके पैसे नुकसान असताना आयडीबीआय बँकेत दिड कोटीच्या ईपीसी मध्ये वाढविण्यासाठी आरोपींनी खोटे कागदपत्र दाखल केले.
आयकर विभागालाही खोटी माहिती पुरविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जयप्रकाश यांनी या संदर्भात आमगाव न्यायालयात धाव घेऊन सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपींविरूध्द भादंविच्या कलम १९१, १९२, १९६, १९७, १९८, १९९, ४०६, ४२०, ४२१, ४२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1.14 crore FIRs, 6 FIRs filed against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.