११२ बालके अतितीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:02 IST2018-03-30T22:02:53+5:302018-03-30T22:02:53+5:30

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. ग्रामीण भागात कुपोषणाची स्थिती सुधारताना दिसत नाही.

112 infants severely malnourished | ११२ बालके अतितीव्र कुपोषित

११२ बालके अतितीव्र कुपोषित

ठळक मुद्देमध्यम श्रेणीत ६४३ बालके : गर्भावस्थेत महिलांकडे होतेय दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. ग्रामीण भागात कुपोषणाची स्थिती सुधारताना दिसत नाही. शहरात कुपोषण नाही असा दावा केला जात आहे. मात्र हा दावाही सपशेल फोल ठरत आहे. जिल्ह्यातील शहरी भागात २८ बालके तर ग्रामीण भागात ८४ बालके अतितीव्र श्रेणीत अशी ११२ बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागात गोंदिया व तिरोडाच्या ९७ अंगणवाडीतील ६ वर्षा पर्यंतच्या ८०१६ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ७४६८ (९३.९३) बालकांची तपासणी करण्यात आली. यात ६ हजार ७९१ (९०.९३) बालके सामान्य श्रेणीत आढळले. ५६६ (७.५७) टक्के बालके कमी वजनाची आढळली. यात १११ (१.४८ टक्के) बालके तीव्र कमी वजनाच्या श्रेणीत आढळले. शहरी भागात फेब्रुवारी महिन्यात एक नवजात व दोन बालमृत्यू झाले आहेत. ५९१ गर्भवती व ६९३ स्तनपान करणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात आली. शहरी भागात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कुपोषणावर आळा घालण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र (वीसीडीसी), ग्रामीण रूग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र (सीटीसी) व जिल्हा रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाºया अभियानात आधीपेक्षा आता सॅम व मॅमची संख्या वाढत आहे. बालकांना सीटीसी, एनआरसी स्तरावर उपचार, आहार, समूपदेशनासाठी पाठविले जाते. सीटीसीमध्ये बालकांना १४ दिवस दाखल केले जाते. ही सुविधा अर्जुनी-मोरगाव ग्रामीण रूग्णालय व तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध आहे. पोषण पुनर्वसन केंद्र बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सुरू आहे. येथे फक्त सॅम श्रेणीतील बालकांचा उपचार केला जातो. ग्रामीण भागासारख्या शहरी भागातील अंगणवाड्या आहेत. शहरातही सॅम व मॅम बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरी भागात कुपोषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
९९ हजार बालकांची तपासणी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १ हजार ७३२ पैकी ८६१ अंगणवाड्यांतील ९८ हजार ८६४ बालकांची तपासणी करण्यात आली.यात ९१ हजार ४०८ (९३.७५) टक्के बालके सामान्य श्रेणीत आढळले. कमी वजनाच्या श्रेणीत ५ हजार १२८ (५.२६) टक्के बालके आढळले. अतितीव्र वजनाच्या श्रेणीत ९६८ (०.९९ टक्के) बालकांचा समावेश आहे. कुपोषणात ८४ बालके अतितीव्र श्रेणीत व ५१५ मध्यम तीव्र श्रेणीत आढळले.

Web Title: 112 infants severely malnourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.