११०० पोलिसांची चाचणी

By Admin | Updated: October 12, 2015 02:04 IST2015-10-12T02:04:58+5:302015-10-12T02:04:58+5:30

पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पोलीस मुख्यालय (कारंजा) येथील ड्रिल शेड मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

1100 police test | ११०० पोलिसांची चाचणी

११०० पोलिसांची चाचणी

पोलीस मुख्यालयात आरोग्य शिबिर : पोलिसांनी केला डॉक्टरांचा सत्कार
गोंदिया : पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पोलीस मुख्यालय (कारंजा) येथील ड्रिल शेड मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात ११०० पेक्षा अधिक गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी शिबिराचा लाभ घेतला.
पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ६ व ७ आॅक्टोबर रोजी इमपॅथी फाऊंडेशन चेंबर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा पोलीस मुख्यालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, दातांची तपासणी व चिकित्सा, मधूमेह तपासणी, ईसीजी, बीएमआय व हाडांची तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर व इमपॅथी फाऊंडेशन चेंबर, मुंबई येथील डॉक्टरांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन केले.
सदर शिबिरात इमपॅथी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगतसिंग पवार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुहास सावंत, डॉ. अजित भुरके, डॉ. मंगेश विश्वकर्मा, डॉ. सुरेश हसेजा, डॉ. श्वेता राणा, डॉ. शिल्पा मेश्राम, डॉ. विद्यासागर मोहन, डॉ. विलास आगासे उपस्थित होते. त्यांच्या चमूने सेवा देवून शिबिर योग्य प्रकारे पार पाडण्यास सहकार्य केले. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या हस्ते डॉक्टरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबिरात पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, यशवंतराव सोहनी, पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी. ईलमकर, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, राखीव पोलीस निरीक्षक सुनिल बाम्डेकर, जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, लिपीक वर्ग व त्यांच्याकुटूंबीया आरोग्य तपासणी केली.
सदर शिबि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) गोंदिया सुरेश भवर, राखीव पोलीस निरीक्षक गोंदिया सुनिल बाम्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण शाखा गोंदिया अभिजीत अभंग, रापोउपनि चंद्रबहादुर ठाकुर, कल्याण शाखा येथील पोहवा सुनिल मेश्राम व राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील नितीन तोमर, रोशन उईके, सेवक राऊत, अंकलेश येसुर यांनी सहकार्य केले.
सदर शिबिराचे संचालन पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख व आभार अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1100 police test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.