शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

११ शौकिनांना दिला पोलिसांनी दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 9:22 PM

सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती.

ठळक मुद्देसूर्याटोला मैदानात जमली होती मैफल : ‘लोकमत’च्या वृत्तावर रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी केलेल्या कारवाईने परिसरातील नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास घेतला आहे.रावजीभाई समाजवाडी समोरील मैदानात मुले खेळतात. तर वयस्क व वृद्ध सकाळी-सायंकाळी पायी फिरतात. जेवण झाल्यावर काही जण या मैदानात शतपावली करायचे. मात्र या मैदानावर आता दारूड्यांचे टोळके बसून दारू पित असतात. दारू पिवून शिवीगाळ व आरडाओरड करण्यासारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांना आता मैदानात जाणे कठीण झाले आहे. रात्री ८.३० वाजतानंतर रस्ताने वाहतूक कमी होताच दारुडे मैदानात आपला तळ ठोकून दारू पित बसतात. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते व त्यांनी रामनगर पोलिसांत तक्रारही दिली होती. मात्र त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.अखेर ‘लोकमत’ने हा प्रकार बातमीच्या माध्यमातून मैदानात सुरू असलेल्या दारूड्यांचा पराक्रम उघडकीस आणला.‘लोकमत’च्या या बातमीची दखल घेत रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुजीत चव्हाण यांनी डी.बी.पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवने, हवलदार बनकर, नाईक, माने, शिपाई केदार, बडवाईक यांनी मैदानावर धाड घालून अस्तावस्त मोटारसायकल सोडून टोळक्या टोळक्याने बसलेल्या एकूण ११ तरुणांना पकडून विचारपूस केली. त्यांचा हेतू आपले आंबट शौक भागविणे, मित्रांसोबत दंगामस्ती करणे असा असल्याचे पोलिसांना लक्षात आले तसेच त्यांनी पोलिसांशी देखील असभ्य वर्तन केल्याने पोलिसांनी त्यापैकी सौरभ विजय गजभिये (२१), अभिषेक महेंद्र लांजेवार (२३), मंगेश ताराचंद राऊत (३०), रजत सत्यजित जांगळे (२५), नोयल अंथेनी सायमन (१७, सर्व रा. रामनगर), अनुज गणेश वासनिक (२७,रा. कुंभारे नगर, पंचशील वॉर्ड) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ प्रमाणे कारवाई केली.तसेच मैदानात विनाकारण घुटमळत असलेले तरुण नामे मोहम्मद बशीर अली (३३), मिर्झा अकबर शेख (३८), मोहसीन ईस्माईल खान (२८,सर्व रा. रामनगर), कमलेश रमेश वासनिक (२८,रा. सूर्याटोला) व अक्षय श्रावण झाडे (२४, रा. भंडारा) यांना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम १४९ प्रमाणे नोटीस दिली आहे.नागरिकांनी मानले ‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात सुरू असलेला प्रकार उघडकीस आणला. शिवाय पोलिसांनी त्यावर कारवाई करीत ११ जणांना दणका दिल्याने मैदानात दारू पिवून गोंधळ घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी कमी झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांच्या त्रासाला लक्षात घेत आता ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे ठाणेदार चव्हाण यांनी सांगीतले.

टॅग्स :liquor banदारूबंदी