शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

११ शाळेतील १६६ बालकामगार झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:27 IST

कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरीबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रत्यक्ष भेटीत आढळले १७२ : २९९ बालकामगारांना दाखल केले नियमित शाळेत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरीबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सर्व बाल संक्रमण शाळांची तपासणी केली असता तब्बल १६६ बालकामगार बेपत्ता असल्याचे लक्षात आले.प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार असल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण विशेष प्रशिक्षणाला शिक्षण विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन बालकामगारांची चौकशी केली असता ही विदारक स्थिती पुढे आली आहे.या १६ बाल संक्रमण शाळांमध्ये ४७१ बालकामगारांना शिक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फक्त १७२ बालकामगारांची उपस्थिती आढळली.२२२२९९ बालकांना नियमीत शाळेत पाठविल्याचे बाल संक्रमण केंद्राकडून सांगण्यात आले. परंतु ते २९९ बालकांपैकी १६६ बालके नियमीत शाळेत आलेच नाही. ना ते नियमीत शाळेत जात आहेत. ना बाल संक्रमण शाळेत आहेत.त्यामुळे दाखल करण्यात आलेले ती १६६ बालके गेली कुठे? ते शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत का? जिल्ह्यातील १६ पैकी ५ बाल संक्रमण विशेष प्रशिक्षण केंद्रातील बालकामगारांची संख्या बरोबर आढळली. प्रशिक्षण केंद्रातील उपस्थिती व नियमीत शाळेत दाखल केलेले विद्यार्थी यांची संख्या बरोबर जुळली. परंतु ११ प्रशिक्षण केंद्रामधील १६६ बालकामगार गेले कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे.गोंदिया शहरातील गोंडीटोला, संजयनगर मूर्री, अदासी, तिरोडा तालुक्यातील नवरगाव व तिरोडा न.प.येथील बालकामगरांची संख्या पटसंख्येनुसार नियमीत शाळेत किंवा प्रशिक्षण केंद्रात बरोबर आढळले.छोटा गोंदियातील सर्वच ३९ बालकामगार गायबबालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने १६ ठिकाणी बाल संक्रमण विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केले. परंतु ११ प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यात आलेले १६६ बालकामगार शिक्षण सोडून केव्हा गेले, याची माहिती तेथील कर्मचाºयांना नाही. छोटा गोंदियातील प्रशिक्षण केंद्रात ३९ बालकांना दाखल करण्यात आले होते. परंतु तेथे एकही बालक चौकशी समितीला आढळला नाही किंवा नियमीत शाळेतही गेले नाहीत.चौकशी समितीने तीन वेळा भेट देऊनही एकही बालक आढळला नाही.गड्डाटोलीतील १८, गौतमनगर १५, यादव चौक १९, सुंदरनगर १९, कुडवा ११, बाबाटोली ८, मुरकूटडोह दंडारी-३ मधील ५, काचेवानीटोला ६, मुंडीकोटा १५, भिमनगर ११ अशी १६६ बालके शाळेत येतच नाहीत.१६ बालकामगारांचे परप्रांतात स्थलांतरणमुंडीकोटा येथील बेपत्ता असलेली १५ बालके परप्रांतात हरियाणा येथे गेल्याचे सांगितले जाते. त्याचा शोध घेऊनही मात्र माहिती मिळाली नाही. नवरगाव येथील एक बालक परप्रांतात स्थलांतरीत झाला आहे. एक कोका आश्रम शाळेत शिकत आहे. भीमनगर प्रशिक्षण केंद्रातील १ बालक दवनीवाडा आश्रम शाळेत शिकत आहेत. न.प. तिरोडा येथील तीन बालके स्थलांतरीत झाली असून सडक-अर्जुनी, सालेकसा व नागपूर येथे प्रत्येकी एक विद्यार्थी शिकत आहे.

टॅग्स :Schoolशाळा