आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या ११ उमेदवारांचा खर्च ‘शून्य’

By Admin | Updated: October 11, 2014 01:51 IST2014-10-11T01:51:57+5:302014-10-11T01:51:57+5:30

निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही.

11 candidates dream of MLAs dream of 'zero' | आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या ११ उमेदवारांचा खर्च ‘शून्य’

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या ११ उमेदवारांचा खर्च ‘शून्य’

नरेश रहिले गोंदिया
निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या ११ उमेदवारांनी अद्याप एक कवडीही खर्च केलेला नाही! आश्चर्यात टाकणाऱ्या या उमेदवारांमध्ये गोंदिया मतदार संघातील ४ व तिरोडा मतदार संघातील ७ उमेदवार आहेत.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील छैलबिहारी अग्रवाल, धर्मेंद्र गजभिये, दिगंबर पाचे व अभियंता राजीव ठकरेले यांनी अद्याप एक कवडीचाही खर्च केलेला नाही. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील अ.कदीर शेख, प्रताप पटले, अविनाश नेवारे, राजकुमार बोहने, मनोहर पटले, श्रावण रहांगडाले, सुरेश टेंभरे यांनीसुद्धा कोणताही खर्च केलेला नाही.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार किरण कांबळे यांनी २ लाख १४ हजार ४४४, काँग्रेसचे राजेश नंदागवळी यांनी १ लाख १४ हजार ८९०, भाजपचे राजकुमार बडोले यांनी २ लाख ८५ हजार ६३०, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रीकापुरे ४ लाख ७८ हजार १३१, बसपाचे भिमराव मेश्राम यांनी १ लाख ८२ हजार ७८७, भारिपचे धनपाल रामटेके यांनी १२ हजार ५३०, अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांनी १ लाख ४१ हजार ८७८, प्रमोद गजभिये यांनी ३६ हजार ५३०, बरसूजी गडपाल यांनी ५ हजार ३०, रत्नदीप दहिवले यांनी ७२ हजार ७३०, दिलवर्त रामटेके यांनी ४७ हजार ४९३, दिलीप वालदे यांनी २४ हजार ५३० तर महेश शेंडे यांनी ५ हजार ३० रुपये खर्च केले आहेत.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी १ लाख ७८ हजार ८८०, भाजपचे विनोद अग्रवाल २ लाख ९१ हजार ६५७, राष्ट्रवादीचे अशोक गुप्ता यांनी ३ लाख ९ हजार २८७, कॉम्युनिस्ट पक्षाच्या करुणा गणवीर यांनी ३ लाख ४९ हजार ३९ रुपये, शिवसेनेचे राजकुमार कुथे यांनी १ लाख ६५ हजार ५६६, बसपाचे योगेश बन्सोड यांनी १९ हजार ८७० रुपये, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोपाल उईके यांनी ६ हजार ३७५, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार विनोदकुमार नंदुरकर यांनी ८४ हजार ७६० रुपये, अपक्ष उमेदवार चिंधू उके यांनी १३ हजार १७५, संतोष उमरे यांनी ४६ हजार ९५०, सुरेश चौरागडे यांनी १ लाख ७४ हजार ९२ रुपये, नारायण पटले यांनी १४ हजार ३३९ रुपये, नामदेव बोरकर यांनी १३ हजार ९२०, लक्ष्मण मेश्राम ६७ हजार १०१, मंगल मस्करे यांनी १० हजार २४० रुपये खर्च केले आहेत.
तिरोडा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे परसराम कटरे यांनी १ लाख ३७ हजार ८१८ रुपये, राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांनी ४ लाख ५२ हजार ५१५, शिवसेनेचे पंचम बिसेन यांनी ८५ हजार ३१० रुपये, भाजपचे विजय रहांगडाले यांनी ४ लाख १० हजार ३६२, बसपाचे दिपक हिरापूरे यांनी ४१ हजार ५१५ रुपये, पिझन्ट्स अ‍ॅन्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडियाचे विरेंद्र जायस्वाल यांनी ९० हजार रुपये, अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड यांनी १ लाख ७ हजार ८२१ रुपये खर्च केले आहेत.
आमगाव विधासभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार रामरतनबापू राऊत यांनी २ लाख ३० हजार १४० रुपये, राष्ट्रवादीचे रमेश ताराम यांनी २६ हजार ५४१, भाजपचे संजय पुराम २ लाख ४९ हजार २९१ रुपये, शिवसेनेचे मुलचंद गावराने यांनी १ लाख ५ हजार ८७६, शारदा उईके यांनी ९३ हजार ५०, सहेसराम कोरोटे यांनी १ लाख २३ हजार १५३, केशव भोयर यांनी ५ हजार २०० रुपये तर संतोष नहाके यांनी ६ हजार १६५ रुपये खर्च केले आहे.

Web Title: 11 candidates dream of MLAs dream of 'zero'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.