शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:07 IST

मुदतीपूर्वीच केले आत्मसमर्पण...

गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी १ जानेवारी २०२६ ची मुदत मागितली होती. प्रवक्ता अनंत याने यासंदर्भात २७ नोव्हेंबरला पत्रक जारी केले होते; पण त्यापूर्वीच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या ११ जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२८) राेजी सायंकाळी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विना विलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे’ असे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर २७ नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत १ जानेवारी रोजी सर्व जण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी अनंतसह ११ जहाल नलक्षवाद्यांसह आत्मसमर्पण केले. याला गोंदिया पोलिस जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दुजोरा दिला, तसेच यासंदर्भातील शनिवारी (दि.२९) माहिती देणार असल्याचे सांगितले.‘पीएलजीए’ सप्ताह न पाळण्याचे आवाहन -प्रवक्ता अनंत याने पीएलजीए सप्ताह न साजरा करण्याचा निर्णयही पत्रकात स्पष्ट केले होते. शस्त्रसमर्पणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहावे, एकत्र निर्णय घ्यावा व व्यक्तिगत शरणागती टाळावी, असेही निर्देश दिले होते. यापूर्वी शरणागती स्वीकारलेल्या सोनू ऊर्फ भूपती व सतीश यांनी या वाटाघाटीत मध्यस्थी करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती.हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळ कमकुवत -जहाल नलक्षवादी हिडमा हा काही दिवसांपूर्वी चकमकीत ठार झाला होता. तेव्हापासून नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून नक्षल चळवळ आता पूर्णपणे कमकुवत झाली आहे. त्यामुळेच १ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पणाची तयारी दर्शविणाऱ्या अनंतने मुदतीपूर्वी शस्त्र ठेवीत दरेकसा दलमच्या ११ नलक्षवाद्यांसह गोंदिया पोलिसांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले.

English
हिंदी सारांश
Web Title : 11 Naxalites Surrender in Gondia; Naxal Movement Weakens After Hidma's Death

Web Summary : Eleven hard-core Naxalites, including spokesperson Anant, of the Dareksa Dalam, surrendered to Gondia police before the January 1st deadline. This comes after the death of Naxal leader Hidma, weakening the Naxal movement. Anant had requested time for surrender but ultimately surrendered early with his team.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस