शिपाई पदाच्या १०७ उमेदवारांची ‘व्हेरीफिकेशन’ चाचणी होणार
By Admin | Updated: July 5, 2014 00:57 IST2014-07-05T00:57:20+5:302014-07-05T00:57:20+5:30
जिल्ह्यातील ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेत असलेल्या भरतीची अंतिम निवड यादी काही दिवसातच लागणार आहे.

शिपाई पदाच्या १०७ उमेदवारांची ‘व्हेरीफिकेशन’ चाचणी होणार
गोंदिया : जिल्ह्यातील ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेत असलेल्या भरतीची अंतिम निवड यादी काही दिवसातच लागणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेत यश मिळविलेल्या उमेदवारांची अंतिम यादी लागण्यापुर्वी गुणवत्तेत समोर असलेल्या १०७ जणांची व्हेरीफिकेशन चाचणी ८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा २५ जून रोजी सकाळी १०.१५ वाजतापासून घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी १०७० उमेदवार पात्र झाले होते. परंतु लेखी परीक्षेला ३५ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे १०३५ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. या पा
गोंदिया जिल्ह्यासाठी यावर्षी शासनाने फक्त २३ नवीन जागा दिल्या आहेत. नवीन असलेल्या २३ जागा व सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या ५३ जागा अशा ७६ जागांची पोलीस शिपाई भरती जून महिन्यात घेण्यात आली. या भरतीचा शेवटचा टप्पा लेखी परीक्षा २५ रोजी मुर्रीच्या भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात घेण्यात आली. ७६ जागांसाठी ४२०० अर्ज आले होते. या अर्जदारांचे कागदपत्र पडताळणी व शारीरीक चाचणीसाठी पात्र आहेत किंवा नाही याची पडताळणी केल्यावर शारिरीक चाचणीसाठी २२५० उमेदवार पात्र ठरले. त्यातील १०७० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. अत्यंत पारदर्शकरीत्या ही संपूर्ण भरती प्रक्रिया करण्यात आली. लेखी परक्ष्ीाा देणाऱ्या उमेदवारांत ८०२ पुरूष तर २३३ महिला आहेत. गैरहजर असणाऱ्यांमध्ये ६ महिला व २९ पुरूष आहेत. १०० गुणांसाठी उमेदवारांना दिड तासाचा वेळ देण्यात आला होता. भारतीय खाद्य निगमच्या चार गोदामात ही लेखी परीक्षा घेण्यात आली.
पेपर ए, बी, सी, डी अशा चार संचात होता. या पेपरची उत्तरपत्रिका शुक्रवारीच पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, महाराष्ट्र पोलीस व गोंदिया पोलीसच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांनी उपस्थीत राहून ही परीक्षा घेतली. या भरतीत शारिरिक चाचणीत व पेपरमध्येही ९०-९० गुणांपेक्षा अधिक गुण घेतलेले उमेद्वार आढळले. यावर्षी अनेक उमेदवारांनी चांगले गुण घेतले आहेत.
मेरिटनुसार अधिक गुण घेणाऱ्या १०७ उमेद्वारांची ‘व्हेरीफिकेशन’ चाचणी ८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्या उमेदवारांचे कागदपत्रे, उंची मोजण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)