मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचा शंभर टक्के निकाल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:53+5:302021-07-20T04:20:53+5:30

शाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य सूची व ४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्थी हर्षद ...

100% result of Manoharbhai Patel Military School | मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचा शंभर टक्के निकाल ()

मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचा शंभर टक्के निकाल ()

शाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य सूची व ४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त करून यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्थी हर्षद मिलिंद बन्सोड, गौरव रमेश लिल्हारे व रित्विकेश अनिलकुमार शिंदे यांनी ९६.४० टक्के गुण प्राप्त केले असून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच हर्षल राजू निमजे याने ९६.२० टक्के, कार्तिक शालिकराम कावळे याने ९४ टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे दि्वतीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खासदार प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा मिश्रा, सुबेदार कैलाश जागडे, सुबेदार रामगोविंद जगणे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: 100% result of Manoharbhai Patel Military School