शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

वडेगाव पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:51 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देचार ट्रॅक्टरवर आकारला दंड : गोंदिया तहसील कार्यालयाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. सोबत चार ट्रॅक्टरवर प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रूपयाचा दंड आकारण्यात आला.वैनगंगा व वाघनदीतून रेतीचा उपसा होत असूनही महसूल विभाग सुस्त आहे. घाट लिलाव न झाल्यामुळे रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु याकडे तहसीलदार लक्ष देत नाहीत. आमगाव तालुक्याच्या पाठोपाठ गोंदिया तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील रेती तस्करांना लगाम लावण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला कारवाई केली. त्यात १०० ब्रास रेतीचा साठा व रेती वाहून नेणारे चार ट्रॅक्टर एकाच दिवशी रंगेहात पकडले.६ फेब्रुवारीला कोचेवाही येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी ४७५२ ट्राली एमएच ३५ एफ ३६९७ ला चालक प्रवीण टेकलाल मरकाम रा.कोचेवाही हा विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना मंडळ अधिकारी डी.एच.पोरचेट्टीवार यांनी पकडले. सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार संतोष पुरनलाल पटले रा.कोचेवाही यांच्या मालकीचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्टÑ जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. त्याच दिवशी अर्जुनी येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी ७२२७ ट्राली एमएच ३६ ९१०९ ला गैरअर्जदार राजकुवर हनुलाल दंदरे रा.बिरसोला हा चालवित होता. विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला.त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. अर्जुनी येथे गैरअर्जदार रामदास डोमा नागफासे रा.बिरसोला याच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर चालक उमेश सुंभारू नागफासे रा.बिरसोला हा विनापरवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. तेढवा येथे ट्रॅक्टर एमएच ३५ जी २२१९ ट्राली एमएच ३५ एफ २२१९ ला गैरअर्जदार दीपक जितसिंग नागपुरे रा. कन्हारटोला हा स्वत: विना परवाना १ ब्रास रेती वाहून नेत असताना पकडले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम २०१७ चे महाराष्ट्र अधिसूचना १२ जानेवारी २०१८ नुसार अधिकाराचा वापर केला. त्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख रूपये शास्तीची रक्कम, १ ब्रास रेतीचा १५ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन ४०० रूपये असा एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. चौघांवर करण्यात आलेल्या दंडाची रक्कम ४ लाख ६१ हजार ६०० रूपये आहे. सदर कारवाई खमारी येथील मंडळ अधिकारी पी.बी.तिवारी, डी.एच. पोरचट्टीवार, आशिष रामटेके, तलाठी आर.एस.नंबुलकर, ए.बी.बडोले, प्रफुल्ल मेश्राम, मुकुंद तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :sandवाळू