बलात्कारी तरूणाला १० वर्षांचा कारावास

By Admin | Updated: June 11, 2016 01:56 IST2016-06-11T01:56:06+5:302016-06-11T01:56:06+5:30

तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने

10 years imprisonment for rapist | बलात्कारी तरूणाला १० वर्षांचा कारावास

बलात्कारी तरूणाला १० वर्षांचा कारावास

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षाचा सश्रम कारावास व ९ हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सुजॉय उर्फ संजय चक्रवर्ती (२४) असे आरोपीचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील गोपीगंज येथील रहिवासी आहे. १९ जानेवारी २०१३ रोजी त्याने वडेगाव येथील १४ वर्ष ७ महिन्याच्या मुलीला पळवून नेले होते. तो वडेगावच्या एका दागिन्यांच्या दुकानात काम करीत होता. त्याने त्या मुलीला पश्चिम बंगाल येथे पळवून नेल्यावर तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी त्या मुलीला आरोपीच्या घरून शोधून आणले. त्याच्याविरूध्द जिल्हा न्यायालयात खटला चालला. त्याच्याविरूध्द सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस. आर. त्रिवेदी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शबाना अंसारी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 10 years imprisonment for rapist