अतिक्रमण करणाऱ्यास १० हजार रुपये दंड
By Admin | Updated: September 21, 2015 01:37 IST2015-09-21T01:37:00+5:302015-09-21T01:37:00+5:30
तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन आपले नाव ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविले.

अतिक्रमण करणाऱ्यास १० हजार रुपये दंड
तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन आपले नाव ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविले. या संदर्भात तुळशीराम गोंधुळे यांनी नायब तहसीलदार विलास कोकवार यांच्याकडग केली आहे. दहा हजार रुपये दंड तसेच प्रतिवर्ष ५० रुपये भू. आकारणी असे एकूण १० हजार २५० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले.
अर्जदार टिकाराम गोंधुळे यांना चांदोरी खुर्द येथे १९६३ ला आबादी प्लाट क्र.६२ व ४९ हे वडील श्रीपत गोंधुळे यांना शासनाकडून मंजूर केले आहे. ४९ वर राहते घर, ६२ वर गुरेढोरे, शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी २०११ ला कच्ची झोपडी बांधली. सदर झोपडी गैरअर्जदार भाऊराव गोंधुळे यांनी पाडून जबरदस्तीने अतिक्रमण करुन प्लाटवर कुंपन घातले आहे.
सदर प्रकरणावर नायब तहसीलदार विलास कोकवार यांनी पुढीलप्रमाणे आदेश काढला आहे. गैरअर्जदार लिलाबाई गोंधुळे चांदोरी खुर्द यांच्याकडून सन २०११-१२ ते सन २०१५-१६ या कालावधी करीता प्रतिवर्ष २००० रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता १०,००० रुपये दंड व ५० रुपये प्रतिवर्ष भू आकारणी असे १० हजार २५० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहे. गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याच्या १५ दिवसाच्या आत अतिक्रमण खाली करावे न केल्यास शसकीय यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटविण्यात येईल व त्यावर लागणारा खर्च गैरअर्जदाराकडून वसूल करण्यात येईल.
मूळ भूखंडधारक तुळशीराम गोंधुळे यांंना मंजूर केलेले भूखंड विहित कालावधीत निवासी प्रयोजनार्थ वापरत आणलेले नाहीत. ही बाब लक्षात घेता त्यांना मंजूर केलेले सदर दोन्ही भूखंड शासन जमा करण्याबाबतचा रितसर प्रस्ताव तलाठी खैरलांजी यांनी स्वतंत्रपणे सादर करावा, असे आदेशात नायब तहसीलदाराने नमूद केले आहे. (शहर प्रतिनिधी)