१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:46+5:302015-12-05T09:07:46+5:30

यावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे.

10 thousand hectare area will be lost for irrigation | १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

उन्हाळी हंगाम कुचकामी : इटियाडोह प्रकल्पात ठणठणाट
मनोज ताजने गोंदिया
यावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे. इटियाडोह प्रकल्पात अवघा ६३.२१ दलघमी (१९.८२ टक्के) जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पातून यावर्षी एक हेक्टर क्षेत्रालाही पाणी देण्याचे नियोजन बाघ-इटियाडोह विभागाने केलेले नाही. गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे उन्हाळी धानासह इतर पिकांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात सर्वाधिक सिंचन इडियाडोह प्रकल्पावरच होते. गेल्यावर्षी या प्रकल्पाच्या पाण्यातून तब्बल ९९०० हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. पण यावर्षी इटियाडोह प्रकल्पातून पाणी वाटपाचे नियोजनच नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकापासून वंचित राहावे लागणार आहे.
या प्रकल्पाचे पाणी घेणाऱ्या ५५ पाणी वाटप संस्थांनीही जलसाठ्याची स्थिती पाहता पाणी घेण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षी जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला उन्हाळी हंगामात सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे.

नियोजन कोणामुळे बिघडले?
यावर्षी मोठ्या प्रकल्पांपैकी इटियाडोह प्रकल्पात असलेला ६३.२१ दशलक्ष घटनमीटर जलसाठ्यापैकी ३.०७२ दलघमी पाणी पिण्यासाठी म्हणून राखीव ठेवावे लागते. काही जलसाठा बाष्पीभवन होऊन कमी होतो. उर्वरित जलसाठ्यातून काही प्रमाणात सिंचन होऊ शकते. पण त्यासाठी पुढाकार घेण्यास पाणी वापर संस्था इच्छुक नाही, की इटियाडोह प्रकल्पाचे व्यवस्थापन, याबाबत काही लोक ‘आॅफ द रेकॉर्ड’ वेगवेगळी चर्चा करीत आहेत. कालव्यांच्या दुरूस्तीची कामे करता यावीत यासाठी खरीप हंगामात जास्तीचे पाणी सोडून रबी हंगामात शेतीला पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आल्याचा आरोप काही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे हे नियोजन बिघडले की मुद्दाम बिघडविले, हे चर्चेचा विषय झाला आहे.

पुराम यांच्यासाठी थांबले आमगाव-सालेकसाचे नियोजन
बाघ प्रकल्पाच्या पाण्याचे गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यात वाटप करण्याच्या नियोजनासाठी गुरूवारी बाघ-इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. संबंधित तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार हे बाघ कालवे सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्यामुळे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हे बैठकीला हजर होते. त्यांनी गोंदिया तालुक्यातील पाणी वाटपाचे नियोजन करवून घेतले. मात्र आमदार संजय पुराम हे हजर नसल्यामुळे आमगाव-सालेकसा तालुक्यात कोणत्या संस्थेला किती पाणी द्यायचे याचे नियोजन होऊ शकले नाही.

बाघ प्रकल्पातून ११८० हेक्टरचे नियोजन
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी कालीसरार प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. त्यामुळे आता केवळ शिरपूर आणि पुजारीटोला धरणावरच रबी हंगामाचे नियोजन अवलंबून आहे. त्यापैकी बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शिरपूरमध्ये ७१.८२ दलघमी तर पुजारीटोलात २५.६२ दलघमी जलसाठा आहे.
बाघ प्रकल्पातून करावयाच्या ११८० हेक्टर सिंचनापैकी गोंदिया तालुक्यातील ५९० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३५४ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २३६ हेक्टर क्षेत्राला हे पाणी मिळणार आहे.
गेल्यावर्षी बाघ आणि इडियाडोह या दोन्ही प्रकल्पांमधून जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. मात्र १२०० हे. होईल.

Web Title: 10 thousand hectare area will be lost for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.