१० आरोपींचा शोध सुरू

By Admin | Updated: September 14, 2015 01:33 IST2015-09-14T01:33:38+5:302015-09-14T01:33:38+5:30

गोंदिया नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेता छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत.

10 search for the accused | १० आरोपींचा शोध सुरू

१० आरोपींचा शोध सुरू

सात आरोपींवर मोक्का : पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेता छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्याकांडात सहभागी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आतील ७ आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र गुन्हे प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही आरोपींचा शोध संपलेला नाही. अजून १० आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
छेदी इमलाह यांची सायंकाळच्या सुमारास भर चौकात गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणातील ज्या सहा आरोपींना पोलिसांनी पकडले त्यांच्यापैकी एका आरोपीची जामिनावर मुक्तता झाली आहे. मोक्काच्या आरोपींसाठी असलेल्या नागपूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी या आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मोक्का लावल्यानंतर अटकपूर्व जामिन रद्द केला जातो. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पोलीस काही आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी दि.१४ ला मोक्का न्यायालयात किंवा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज लावल्या जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आरोपींची अटकपूर्व जमानत रद्द करण्यासाठी पोलीस सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी करीत आहे.
गेल्या १२ जूनला आंबेडकर चौकात झालेल्या या हत्याकांडात शाहरूख खान फिरोज खान पठान (२१), यशोदास हरपाल (२३), लोकेश ऊर्फ कल्लू यादव (३३), सुभम बैरीसाल (१९), छत्रसाल ऊर्फ बंटी बानेवार (४९), जबलपूर निवासी शेखर ऊर्फ अशोक सोनकर (३१) यांना आतापर्यंत अटक झाली आहे. याशिवाय पंकज यादवला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. ज्या आरोपींना पोलीस अटक करू इच्छितात त्यांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंदियात विकल्या १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्वर?
गोंदियात विकल्या १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्वर?
पोलिसांनी अटक केलेल्या जबलपूर येथील आरोपीने गोंदिया शहरात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त रिव्हॉल्व्हर विकल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. ज्यांना रिव्हॉल्वहर विकल्याची माहिती सदर आरोपीने दिले त्यांना गाठून पोलीस चांगलीच कमाई करीत असल्याची जोरदार चर्चा आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, आधी जबलपूर पोलिसांच्या हाती तो लागला त्यावेळी त्याने गोंदिातील पाच आरोपींची नावे सांगितली. जबलपूर पोलीस गोंदियातील पाच आरोपींना पकडून घेऊन गेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. गोंदिया पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तीन जणांचे नाव सांगितले. त्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. त्यापैकी एकाने रिव्हॉल्वर खरेदी केल्याची कबुली दिली. परंतू ती खराब निघाल्याने परत केली. दुसऱ्या एका आरोपीनेही याच पद्धतीने कबुली दिली.

Web Title: 10 search for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.