१० प्रवाशांना लुबाडले

By Admin | Updated: June 1, 2015 01:47 IST2015-06-01T01:47:59+5:302015-06-01T01:47:59+5:30

नागपूर टाटा पॅसेंजर रेल्वेगाडीत भंडारा - तुमसर रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी आठ ते दहा प्रवाशांना लुबाडण्याची घटना घडली.

10 looted passengers | १० प्रवाशांना लुबाडले

१० प्रवाशांना लुबाडले

रेल्वेचे दुर्लक्ष : प्रवासी रेल्वेगाडीतील प्रकार
तुमसर : नागपूर टाटा पॅसेंजर रेल्वेगाडीत भंडारा - तुमसर रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी आठ ते दहा प्रवाशांना लुबाडण्याची घटना घडली. या मार्गावरील प्रवाशात भीती व्याप्त आहे. सुरक्षा योजनांचा येथे बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
सध्या साधारण प्रवासी रेल्वे गाडीत प्रचंड गर्दी आहे. कामठी तथा नागपूर येथून प्रवाशांना लुबाडणारी टोळी सक्रीय आहे. विविध आमिष प्रवाशांना देऊन ही टोळी सदस्य प्रवासादरम्यान त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कैचीत पकडतात. एखादी वस्तू घेण्यास बाध्य करतात. संवादामध्ये त्यांची फसवणूक करतात. या टोळीचा हातखंडा आहे. नगदी रुपये तथा सोन्याचे दागिन्यावरही ही टोळी हात साफ करते.
रविवारी नागपूर टाटा पॅसेंजर प्रवाशी गाडीत आठ ते दहा प्रवाशांना लुबाडण्याची घटना घडल्याची माहित एका प्रत्यक्षदर्शीने सांगितली. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याला या प्रत्यक्षदर्शीने ही माहिती तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दिली. यापुढे १८२ या टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांनी तत्काळ सूचना देण्याचे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. कामठी तथा नागपूर येथून ही टोळी पॅसेंजर प्रवासी गाडीतून आमगाव पर्यंत प्रवास करून शेकडो प्रवाशांना दररोज लुबाडणूक करीत आहे. परंतु आतापर्यंत या टोळीचा पर्दाफाश झाला नाही. यात अर्थकारण दडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरक्षा योजनांचा येथे बोजवारा उडाल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 10 looted passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.