शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत १० किलो गांजा लागला हाती; आरपीएफची विशेष मोहीम

By कपिल केकत | Updated: May 21, 2023 19:11 IST

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये मिळाली बॅग

कपिल केकत, गोंदिया :रेल्वेपोलिस दलकडून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत पथकाने पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये मिळून आलेल्या एका बॅगमधून १० किलो गांजा ताब्यात घेतला आहे. शनिवारी (दि.२०) दुपारी २:३९ वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

रेल्वेगाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची गर्दी वाढली असून याचाच फायदा घेत अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्यातूनच रेल्वे पोलिस दलाचे पथक रेल्वे स्थानक परिसर तसेच प्रवासी गाड्यांमध्ये निगराणी व तपासणी करून ‘ऑपरेशन नार्कोस’ राबवत आहेत. अशात गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शनिवारी (दि.२०) दुपारी २:३९ वाजतादरम्यान रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक-३ वर आलेल्या पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८४३) मधील एस-६ डब्यात तपासणी करून सीट क्रमांक-५८ च्या खाली बेवारस स्थितीत पडून असलेला एक लाल रंगाचा ट्रॉली बॅग जप्त केला.

पथकाने त्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना बॅगबद्दल विचारपूस केली असता कुणीही बॅगच्या मालकाबद्दल काहीच सांगू शकले नाही. पथकाने बॅग उघडून बघितले असता त्यात खाकी रंगांच्या नऊ लहान पाकिटांत गांजा भरून असल्याचे दिसले. यावर पथकाने बॅग व पाकीट रेल्वे पोलिस बलच्या कार्यालयात आणले व अधिकारी आणि पंचांसमक्ष मोजणी केली. त्यात १० किलो गांजा आढळला असून त्याची किंमत लाखो रूपयांत आहे. त्यातील काही नमूने काढून उर्वरित गांजा अपर तहसीलदार प्रकाश तिवारी यांच्या समक्ष सील केले. प्रकरणी एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे पोलिस दलचे उपनिरीक्षक सी.के.पी.टेम्भूर्णिकर, प्रधान आरक्षक राजेंद्र रायकवार व सहकाऱ्यांनी केली.

महिन्यातील दुसरी मोठी कारवाई

- विशेष म्हणजे रेल्वे पोलिस बलकडून १ मे रोजी पुरी-सूरत सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून सुमारे साडेसात किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यात आता २० तारखेला १० किलो गांजा पकडण्यात पथकाला यश आले आहे. यावरून प्रवाशांची गर्दी बघून अंमली पदार्थांची तस्करी करणारे अधिक सक्रिय होतात असे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgonda-pcगोंडाrailwayरेल्वेPoliceपोलिस