१0 दिवसीय धम्म प्रशिक्षणाची सांगता
By Admin | Updated: May 30, 2014 00:12 IST2014-05-30T00:12:37+5:302014-05-30T00:12:37+5:30
गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे १0 दिवशीय बौद्ध उपासिका धम्म प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली.

१0 दिवसीय धम्म प्रशिक्षणाची सांगता
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे १0 दिवशीय बौद्ध उपासिका धम्म प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षण हनवत मेश्राम होते. अतिथी म्हणून प्रकाश डोंगरे, देवाराम मेश्राम, राजेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम, चंद्रिकापुरे व सरपंच उपस्थित होते.
या धम्म प्रशिक्षण शिबिरात शिक्षिका म्हणून मुंबई येथील सुहासिनी यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात दरदिवशी ११२ ते ११५ प्रशिक्षणार्थी सहभागी होत होते. शिबिरात संस्थेचे उद्देश्य, बुद्धांची तत्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला बुद्ध धम्माचा मार्ग, महिलांना संदेश, २२ प्रतिज्ञा, रमाईचा आदर्श, पौर्णिमांचे महत्त्व, मंगलदिन तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री यावर धम्मोपदेश करण्यात आला. शिवाय भैयासाहेबांचे जीवनकार्य, बौद्धांच्या सवलती, रमाई, भीमाई यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात प्रशिक्षित झालेल्या उपासिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शिबिरामुळे आज आम्हाला खर्या अर्थाने धम्माची जाणीव झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी, अंधश्रद्धेत राहू नये, निर्व्यसनी राहावे, भेदभाव करू नये, अहंपणा करू नये व नियमित धम्माचे आचरण करावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीक्षा उके यांनी तर संचालन ज्ञानेश्वर उके यांनी केले. शिबिरासाठी अलका राहुलकर, जयश्री मेश्राम, ज्योती उके, रजनी राहुलकर, प्रियंका राहुलकर, जयश्री तिरपुडे, मंदा गजभिये, पुस्तकला मेश्राम, प्रमिला राहुलकर, साधना भावे, रूपलता मेश्राम, रमा राहुलकर, पुष्पा खोब्रागडे, सीमा चंद्रिकापुरे, विशाल उके, आम्रपाली उके आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)