जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळसदृश जाहीर

By Admin | Updated: April 1, 2016 02:03 IST2016-04-01T02:03:53+5:302016-04-01T02:03:53+5:30

सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे,

10 9 villages in the district are drought prone | जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळसदृश जाहीर

जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळसदृश जाहीर

गोंदिया : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे, अशी १०९ गावे दुष्काळसदृश म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहेत. ही १०९ गावे गोरेगाव, देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील आहेत.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या दृष्काळसदृश गावांच्या यादीत गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव दाखविले नव्हते. मात्र आता त्यात ही गावे समाविष्ट केली जातील.
दुष्काळसदृश असणाऱ्या गावांमध्ये गोरेगाव तालुक्यातील- मोहगाव बुज., धुंडाटोला, बोटे, सोनी, नोनीटोला, चिल्हाटी, मुरदोली, गराडा, जांभुळपाणी, सोदलागोंदी, हिराटोला, चांदीटोला, तेढा, हलबीटोला(तेढा), निंबा, हलबीटोला (निंबा), पिपरटोला, पठाणटोला, गोवारीटोला, चिचटोला, तिल्ली, गौरीटोला, मोहगाव. देवरी तालुका- लेंडीजोब, मुरपार(रिठी), बोरगाव/बा., चारभाटा, फुटाणा, हलदी, जेठभावडा, गडेगाव, कोसबी/बु., बेलगाव, परसोडी, कवलेवाडा, आलेवाडा, मोहगाव, पिंडकेपार, आंभोरा, कोसबी/खु,, केशोरी, खामखुर्रा, निलज, धानोरी, भागी/सी., सिरपूर, मुरमाडी/रिठी, कोटजांभोरा, देवलगाव, कळीकसा, मेहताखेडा, पावरझोला, वांढरा, डोंगरगाव, रेहडी, चिल्हाटी, वडेकसा, मुरमाडी, तुमडीकसा, ककोडी, कुणबीटोला, उचेपूर, महाका, चिपोटा, धवलखेडी, मिसपीरी, धमदीटोला, येळमागोंदी, पिपरखारी, मोहाडी, वासनी, सुंदरी, पवनी/रिठी, इस्तारी, सुकळी, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, धोनाडी, सिंगनडोह, मैसुरी, बोंडे, पळसगाव, धमदीटोला, पालांदूर/जमी., गरारटोला, मगरडोह, बाळापूर, चुंभली, घोघरा, चिचगड. सालेकसा तालुका- कावराबांध, मोहाटोला, झालीया, साकरीटोला, धानोली, दरवडा, घोसी, बिंझली, लटोरी, ससईटोला, नवेगाव, पाथरी, ब्राम्हणी. आमगाव तालुका- सावंगी, चिचटोला, पदमपूर, ब्राम्हणी, पिपरटोला या गावांचा समावेश आहे.

Web Title: 10 9 villages in the district are drought prone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.