६७ हजारांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:19+5:30
यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोहनलाल गोमन कुराडे (४८) रा.पांढराबोडी याला दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना पकडले.

६७ हजारांची दारू पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून अवैधरित्या दारू विक्री करीत असलेल्या विक्रेत्यांना पोलिसांनी झटका दिला आहे. पोलिसांनी आठ अवैध दारू विक्रेत्यांना पकडले असून त्यांच्याकडील ६६ हजार ७५० रूपयांची दारू व वाहन जप्त केले आहे.२१ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान या कारवाया करण्यात आल्या आहेत.
यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोहनलाल गोमन कुराडे (४८) रा.पांढराबोडी याला दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना पकडले. पोलिसांनी दुचाकी व देशी दारू असा ३२ हजार १७० रूपयांचा माल जप्त केला. तिरोडा पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी रामसागर वॉर्ड येथे आरोपी वर्षा आशिष कोटांगले (४०) घरी धाड टाकून पाच हजार रूपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. रामनगर पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी ग्राम कुडवा येथील आंबडेकर चौकातील रहिवासी आरोपी विजय मोहन मेश्राम (५४) यांच्या घरातून पाच हजार ४०० रूपयांचे देशी दारूचे पव्वे जप्त केले.
गंगाझरी पोलिसांनी ग्राम गोंदेखारी येथे आरोपी रामप्रकाश लोकराम लांजेवार (४२) रा.गोंदेखारी याच्या घरातून आठ हजार रूपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. त्याचप्रकारे, १ जानेवारी रोजी केशोरी पोलिसांनी ग्राम बोंडगाव-सुरबन येथे एक हजार ४४० रूपयांची देशी दारू जप्त केली.तर आरोपी देवानंद नकटू कोडापे (४७) याच्या घरातून दोन हजार ४०० रूपयांची देशी दारू जप्त केली.तसेच ३ जानेवारी रोजी गंगाझरी पोलिसांनी ग्राम कवलेवाडा येथे आरोपी चैनलाल यशवंतराव तांडेकर (४०) याच्या घरातून आठ हजार रूपये किंमतीची हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
अशाप्रकारे पोलिसांनी आठ कारवायांत एक दुचाकी तसेच देशी व हातभट्टीची दारू असा एकूण ६६ हजार ७५० रूपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींवर मदाका कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.