शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

३३ पैकी १ कोरोना बाधित झाला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजूनही काही भागात लॉकडाऊन असल्याने रोजगारासाठी विविध राज्य आणि विदेशात गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतू लागले आहे. दुबई आणि दिल्लीहून आलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सुदैवाने बाहेरुन आलेल्या या सर्व नागरिकांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क न आल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता ३२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण : ८५ स्वॅब नमुन्याचा अहवाल अप्राप्त'

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसात एकही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण ३३ कोरोना बाधितांपैकी एक कोरोना बाधित रविवारी (दि.२१) कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता ३२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.दोनदा पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि विदेशातून आलेल्या नागरिकांमुळे १२ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. आठ दिवसांच्या कालावधीतच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३ वर पोहचला होता. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजूनही काही भागात लॉकडाऊन असल्याने रोजगारासाठी विविध राज्य आणि विदेशात गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतू लागले आहे. दुबई आणि दिल्लीहून आलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सुदैवाने बाहेरुन आलेल्या या सर्व नागरिकांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क न आल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. विशेष मागील तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात नवीन कोराना बाधिताची नोंद झाली नाही. तर ३३ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांपैकी रविवारी (दि.२१) एक जण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यात ३२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १८१४ रूग्णांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०२ स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून १६२७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८५ नमुन्याचा अहवाल येथील शासकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या