शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २८ हजार खड्डे वृक्षारोपणाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले.

ठळक मुद्देयंदा ३३ कोटी वृक्ष लागवड योजना वांद्यात । सत्ता बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेवून वृक्षारोपण केले होते. परंतु दिलेल्या उद्दिष्टापैकी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींनी एक लाख २८ हजार ३६९ खड्डे खोदल्यानंतरही त्यात वृक्षारोपणच करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले. वृक्षलागवडासाठी जिल्ह्यातील २२ हजार १८८ जणांचा लोकसहभाग होता. या लोकसहभागातून खोदण्यात आलेल्या खड्यांमध्ये रोपटे लावून वृक्षसंवर्धन करायचे होते. परंतु १५ लाख ८५ हजार ३८१ रोपटे लावण्यात आले होते. उर्वरीत १ लाख २८ हजार ३६९ खड्यांमध्ये वृक्षारोपणच करण्यात आले नाही.शासनाने गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. खोदलेल्या खड्यांसाठी रोपटे देखील मागविण्यात आले. परंतु त्या खड्यात रोपटे लावण्यात आले नाही. काही ग्रामपंचायतींनी रोपटे न लावता ते बाहेर फेकून दिले होते. शासनाने वृक्षलागवडीसाठी निधी दिला नव्हता त्यामुळे ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जाते.यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविनापावसाळ्यात दरवर्षी एकाच खड्यात अनेकदा रोपटे लावले जात असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी अनेक रोपटे जगले आणि त्यांचे संवर्धनही करण्यात आले. परंतु वृक्ष लागवडीकडे तत्कालीन सरकारचे लक्ष होते. आता ठाकरे सरकार आले. परंतु या ठाकरे सरकारला कोरोना या विषाणूशी लढा देण्यातच वेळ लागत असल्याने वृक्षलागवडीचा संकल्प यंदा मागे पडला. यंदाच्या पावसाळ्यात स्वयंत्स्फूर्तीने वृक्ष लागवड केल्यास वृक्ष लागवड होईल. अन्यथा यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविना जाणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforest departmentवनविभाग