हिट अँड रन प्रकरणातील कारचालक युरी आलेमाव यांचा स्टाफ ड्रायव्हर: कुंकळ्ळीतील घटना
By सूरज.नाईकपवार | Updated: December 18, 2023 21:05 IST2023-12-18T21:05:27+5:302023-12-18T21:05:52+5:30
तो कारचालक विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांचा स्टाफ ड्रायव्हर निघाला.

हिट अँड रन प्रकरणातील कारचालक युरी आलेमाव यांचा स्टाफ ड्रायव्हर: कुंकळ्ळीतील घटना
मडगाव: अपघाती मृत्यू करुन नंतर घटनास्थळाहून पोबारा केलेला तो कारचालक विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांचा स्टाफ ड्रायव्हर निघाला. देविदास मयेकर (४९) असे संशयिताचे नाव असून, त्याला या अपघात प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी अटक करुन नंतर जामिनावर सोडले अशी माहिती कुंकळ्ळी पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली.दरम्यान, युरी आलेमाव यांनी ट्विट करुन झाल्या घटनेबाबत ही एक दुदैवी घटना असल्याचे सांगितले. मयताच्या कुटुंबियाच्या दुखात आपण संपूर्ण सहभागी असल्याचे ते म्हणाले.
या अपघातात मार्डीकोटो कुंकळ्ळी येथील सनी प्रमोद शिरोडकर (३९) हा गंभीर जखमी होउन नंतर त्याचे इस्पिळात दुखद निधन झाले होते.शुक्रवार दि. १५ रोजी गुल्लेकोटो येथे हा अपघात घडला होता. संशयिताने भरधाव वेगाने कार चालविताना एका लॉरीला ऑव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली होती. अपघातांनतर संशयित मयेकर याने घटनास्थळाहून वाहनासह पोबारा केला होता.
या प्रकरणी अज्ञाताविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी भांदसंच्या २७९, ३०४ (अ) व वाहतुक कायदा कलम १३४ अंतर्गत गुन्हा नाेंद केला होता. आज तो पोलिसांना शरण आला. नंतर त्याला रितसर अटक करुन मागाहून जामिनावर सोडण्यात आले.संशयित जी कार चालवित होता ती माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्या पत्नीच्या नावे आहे.ज्योकीम हे युरी आलेमाव यांचे वडील आहे. मयत डीएसआरडीसी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.