गोव्यातील दक्षिण गोव्यात सॉफ्ट डिंक्रसच्या वाहनाची धडक बसून एक युवक ठार
By सूरज.नाईकपवार | Updated: November 5, 2023 14:40 IST2023-11-05T14:23:26+5:302023-11-05T14:40:40+5:30
बाराडी वेळ्ळी येथे पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली.

गोव्यातील दक्षिण गोव्यात सॉफ्ट डिंक्रसच्या वाहनाची धडक बसून एक युवक ठार
सूरज नाईक पवार, मडगाव: साॅफ्ट डिंक्रस वाहतुक टेम्पोने धडक दिल्याने एका दुचाकी चालकाला आपला जीव गमवावा लागला. गोव्यातील दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाराडी वेळ्ळी येथे पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली.
सॅनरॉय रमेश पिंटो (२०) असे मयताचे नाव असून, तो बाराडी येथील रहिवाशी आहे. या प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी त्या चालकाविरोधात भादंसंच्या २७९ च ३०४ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र वेळीप पुढील तपास करीत आहेत.संशयित बेतुल येथून बाराडी येथे जात होता. तो भरधाव वेगाने वाहन हाकत होता.
पुढून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. यात त्या दुचाकीवरील सॅनरॉय हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेत असताना वाटेवर त्याचे निधन झाले.