स्वयं अपघातात युवक ठार
By काशिराम म्हांबरे | Updated: November 3, 2023 10:50 IST2023-11-03T10:50:08+5:302023-11-03T10:50:35+5:30
तो चालवत असलेल्या दुचाकीवरील त्याचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला.

स्वयं अपघातात युवक ठार
काशिराम म्हांबरे, म्हापसा: दत्तवाडी म्हापसा येथील उतरणीवर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या स्वयं अपघातात मेहबूब उल खान हा ३० वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. तो चालवत असलेल्या दुचाकीवरील त्याचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला.
ज्या वेळी हा अपघात घडला त्या वेळी त्यांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. अपघातानंतर दुचाकीवरून खाली पडताच त्याच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागाला मार लागला. तातडीने त्याला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पोलिसांनी नंतर त्याचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवला आहे. फळ विक्रीचा व्यवसाय करणाºया मेहबूब उल खान यांनी हॅलेमेटचा वापर केला असता तर कदाचीत तो वाचू शकला असता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.