चिंबल येथील चिरेखाणीत तरुण बुडाला: मुंबईहून काकाकडे सुटीत गोव्यात आला होता
By पूजा प्रभूगावकर | Updated: November 20, 2023 17:16 IST2023-11-20T17:12:20+5:302023-11-20T17:16:09+5:30
डेरीक हा काही दिवसांपूर्वी मुंबईहून मेरशी येथील आपल्या काका कडे राहण्यासाठी आला होता.

चिंबल येथील चिरेखाणीत तरुण बुडाला: मुंबईहून काकाकडे सुटीत गोव्यात आला होता
पणजी: शिरेन - चिंबल येथील एका बंद चिरेखाणीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला डेरीक राज वाझ (१९,अंधेरी मुंबई) याचा बुडून मृत्यू झाला. डेरीक हा काही दिवसांपूर्वी मुंबईहून मेरशी येथील आपल्या काकाकडे राहण्यासाठी आला होता.
या घटनेमुळे चिंबल येथे एका एकच खळबळ उडाली असून डेरीक याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डेरीक हा आपल्या काही मित्रांसमवेत चिंबल येथील चिरेखाणीत पोहण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो यात बुडाला.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांच्याकडे डायव्हर्स नसल्याने त्याचा शोध घेण्यास अडचण आली. अखेर खासगी डायव्हर्स ची साेय केल्यानंतर सोमवारी पुन्हा त्याचा शोध घेण्यात आला. अखेर सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास डेरीक याचा मृतदेह हाती लागला. यावेळी त्याचे कुटुंबिय घटनास्थळी उपस्थित होते. मृतदेह सापडताच त्यांनी एकच आक्रोश केला.