स्कुटीवरुन झालेल्या अपघात तरुणीचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी
By काशिराम म्हांबरे | Updated: March 11, 2024 15:27 IST2024-03-11T15:26:27+5:302024-03-11T15:27:15+5:30
. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे त्यांच्या भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जात होते.

स्कुटीवरुन झालेल्या अपघात तरुणीचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी
काशिराम म्हांबरे
म्हापसा : राज्यातील अपघातांची मालीका सुरुच असून आज सोमवारी सकाळी सव्वा पाचच्या दरम्यान हणजूण येथे झालेल्या भीषण अपघातात आंद्र प्रदेशातील टी पूजिता या २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेला तिचा मित्र सहकारी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे त्यांच्या भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जात होते. त्याची दुचाकी स्टारको जंक्शनजवळ पोहचली असता चालकाने वाहनावरील त्याचे नियंत्रण गमावले आणि ते तेथील कंपाउंडच्या भिंतीवर आदळले. दिलेल्या धडकेनंतर मागे बसलेली मुलगी रस्त्यावर उसळून पडली. दुर्दैवाने त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारच्या चाकाखाली आली. कारने त्या मुलीला सुमारे १०० मिटर फरफटत नेले आणि त्यातच त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील चौकशी निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्नाखाली सुरु केली आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील रस्ता अरुंद आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवताना चालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात घडल्याची माहिती स्थानीकांकडून देण्यात आली