तांत्रिक मंत्राचे आमिष दाखवून योगगुरूने केला बलात्कार

By Admin | Updated: February 8, 2017 14:05 IST2017-02-08T14:05:08+5:302017-02-08T14:05:08+5:30

तांत्रिक मंत्र देण्याचे आमिष दाखवून योगगुरूने अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Yogguru's rape by showing the lait of Tantric Mantra | तांत्रिक मंत्राचे आमिष दाखवून योगगुरूने केला बलात्कार

तांत्रिक मंत्राचे आमिष दाखवून योगगुरूने केला बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 8 - तांत्रिक मंत्र देण्याचे आमिष  दाखवून योगगुरूने अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याची घटना  उघडकीस आली आहे. उत्तर गोव्यातील कोरगाव येथे हे बलात्कारकांड घडले असून, याप्रकरणी पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित योगगुरूला अटक केली आहे.   
याबाबत अधिक माहिती देताना पेडणे पोलिसांनी सांगितले की, अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेने काल प्रतीक कुमार अगरवाल या योगगुरूविरोधात बलात्काराची तक्रार केली. या योगगुरूने तांत्रिक मंत्र देण्याचे आमिष दाखवत 2 फेब्रुवारी रोजी कोरगाव येथे आपल्यावर बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.   या योगगुरूने लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. तसेच त्याने एका कॅनेडियन महिलेसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.  
ही पीडित महिला सात दिवसांच्या योग शिबिरात भाग घेण्यासाठी गोव्यात आली होती. एका संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आघारे तिने या योग शिबिरासाठी प्रवेश मिळवला होता. तसेच तिच्यासोबत अन्य 7 परदेशी नागरिकही योग शिबिरात आले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: Yogguru's rape by showing the lait of Tantric Mantra