शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

हरिद्वारच्या प्रशिक्षकांकडून गोव्यातील शिक्षकांना योगाचे टाॅनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:37 AM

हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

पणजी : हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मूल्य शिक्षण देणे विद्यालयांमध्ये येत्या महिन्यात सुरू होत आहे.

गोव्यातील 151 विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यापुढे लवकरच गोव्यातील उर्वरित सर्व सरकारी प्राथमिक विद्यालयांमधून योग शिक्षण सुरू केले जाईल, असे गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर यांनी येथे लोकमतला  सांगितले. यासाठी उर्वरित शिक्षकांना हरिद्वारमधील विद्यापीठाच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल, असे पाटणेकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना प्राणायाम व आसने शिकविली जातील. शिवाय योग हा विषय अभ्यासक्रमातून लागू केला जाईल, असे पाटणेकर यानी सांगितले. गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध समस्या आढळून येतात. काहीजणांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही तर काहीजण व्यसनांच्या आहारी जातात. काहीजण भावनिकदृष्ट्या अडचणीत असतात तर काहीजण आत्महत्या करण्याचा विचार करतात. या सर्व प्रश्नांवर योगाद्वारे भविष्यात उपाय निघेल असा विश्वास पाटणेकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान येत्या नोव्हेंबरपासून प्रथमच राज्यातील विद्यालयांमध्ये मूल्य शिक्षण सुरू केले जाईल. त्यासाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण खात्याकडे उपलब्ध झाली आहेत. मुत्ता फाऊंडेशन त्यासाठी  गोव्याला मदत करत आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर