शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्तगाळमधील श्रीराम मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात; महोत्सवाच्या तयारीला वेग, श्रीराम दिग्विजय रथ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:47 IST

मूर्तीचे काम २५ रोजीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पैंगिण : पर्तगाळी येथे उभारण्यात येणाऱ्या ७७ फूट उंचीच्या भव्य आणि आकर्षक अशा श्रीरामाच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्तगाळी मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामींनी भेट देऊन कामाची पाहणी करून माहिती घेतली. मूर्तीचे काम २५ रोजीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पर्तगाळी मठाजवळच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खास हेलिपॅड उभारण्याचे काम चालू आहे, त्या कामाचीही पाहणी स्वामींनी केली. यावेळी महोत्सवाच्या आयोजनासाठी सरकारी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, बांधकाम आणि आयोजनावर देखरेख ठेवणारे दिनेश पै, अभय कुंकळ्येकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मूर्तीचे, मुख्य मंडपाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. वाहन तळ आणि भोजन कक्षाचे काम देखील पूर्णत्वाकडे आलेले आहे. पंचशताब्दी महोत्सवानिमित्त श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळीकडून बद्रीनाथ येथून सुरू करण्यात आली श्री राम दिग्विजय रथयात्रेचे काल पोळेमार्गे गोव्यात आगमण झाले. रथाचे उत्साहात स्वागत झाले.

या महोत्सवाच्या कामात देशाच्या विविध भागातील शेकडो कामगार गुंतले आहेत. या कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम काणकोणचे सामाजिक आरोग्य केंद्र करीत आहेत. दोन वर्षांपासून इमारत बांधणी, सफाई, 3 रंगकाम, फर्निचर तयार करणे, रस्त्याचे काम आणि अन्य कामासाठी विशेषतः बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतून आलेल्या जवळ-जवळ १००० कामगार येथे काम करतात.

काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून 3 त्यांची आरोग्य तपासणी केली जाते, अशी माहिती आरोग्य निरीक्षक प्रणय नाईक यांनी दिली. तपासणी पथकात नाईक यांच्यासह, डॉ. दिवाकर वेळीप, मनोज तारी, जितेंद्र काणकोणकर व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रामनाम जप सुरू करण्यात आलेल्या गोकर्ण येथील ९१ व्या केंद्राला या रथाने भेट दिल्यानतंर २१ रोजी हा रथ कारवारला पोहोचला व पोळेमार्गे गोव्यात दाखल झाला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shri Ram Statue in Pertagal Nears Completion; Festival Prep Ramps Up

Web Summary : The 77-foot Shri Ram statue in Pertagal is nearing completion, with dignitaries inspecting the work. Preparations for the upcoming festival are accelerating, including setting up a helipad and facilities. A Shri Ram Digvijay Rath Yatra has arrived in Goa, adding to the festive atmosphere. Hundreds of workers are involved, with health checks underway.
टॅग्स :goaगोवाTempleमंदिरtempleमंदिर