'पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा': सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2024 13:46 IST2024-03-07T13:45:22+5:302024-03-07T13:46:39+5:30
बोरी येथील श्री साईबाबा मंदिराच्या मंडपात शिरोडा भाजप मंडळातर्फे आयोजित केलेल्या नारीशक्ती कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते.

'पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा': सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजनांचा शिरोडा मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
बोरी येथील श्री साईबाबा मंदिराच्या मंडपात शिरोडा भाजप मंडळातर्फे आयोजित केलेल्या नारीशक्ती कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, बोरी पंचायतीचे सरपंच दुमिंगो वाज, उपसरपंच रश्मी नाईक, शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष सुरज नाईक, साईबाबा देवस्थान मंडळाचे अध्यक्ष दिनेश नाईक रायकर, सचिव उमेश नाईक, अवधूत नाईक, संदेश प्रभुदेसाई, किरण नाईक, जयेश नाईक, विनय बोरकर, गौरी शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरोडा मतदारसंघातील महिला मोर्चाच्या सुमित्रा नाईक, रमिता नाईक, दीपाली नाईक मिलन गावकर, कामिनी शिरोडकर, हेजल नाईक अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुरज नाईक यांनी स्वागत केले. गौरी शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर पल्लवी शिरोडकर यांनी आभार मानले.