मांडवीत उडी टाकून महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: March 10, 2016 02:01 IST2016-03-10T01:59:12+5:302016-03-10T02:01:57+5:30

पणजी : मानसिक रुग्ण असलेल्या विवाहित महिलेने बुधवारी धावत्या गाडीतून उतरून मांडवीत उडी टाकून आत्महत्या केली. या महिलेचे

Woman suicide | मांडवीत उडी टाकून महिलेची आत्महत्या

मांडवीत उडी टाकून महिलेची आत्महत्या

पणजी : मानसिक रुग्ण असलेल्या विवाहित महिलेने बुधवारी धावत्या गाडीतून उतरून मांडवीत उडी टाकून आत्महत्या केली. या महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते आणि इस्पितळातून घरी जाताना तिने हा अघोरी मार्ग पत्करला.
या महिलेचे नाव विद्या प्रभू (वय ३५) असे असून
ती मयडे येथील रहिवासी आहे.
मानसिक आजारामुळे तिच्यावर बांबोळी येथील मानसोपचार केंद्रात उपचार सुरू होते. बुधवारीही तिला उपचारासाठीच नेण्यात आले होते. कुटुंबीयांबरोबर तेथून परत येत असताना मांडवीच्या जुन्या पुलावर पोहोचल्यावर तिने अचानक कारचा दरवाजा उघला. ती बाहेर उडी टाकेल, या भीतीने चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबविल्यावर कुणालाही अडविण्याची संधी न देता ती खाली उतरली आणि तिने पुलाच्या कठड्याकडे धाव घेतली. तेथून सरळ खाली उडी टाकली.
तिला दोन मुले आहेत. आजाराला कंटाळून
तिने हा मार्ग पत्करल्याची शक्यता पोलीस
व्यक्त करीत आहेत. पणजी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Woman suicide