'डक्ट' पद्धती वापरणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:58 IST2025-03-06T12:57:34+5:302025-03-06T12:58:14+5:30
सुमारे १०० कोटी हून ज्यास्त खर्च त्यावर अपेक्षित आहे.

'डक्ट' पद्धती वापरणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पायाभूत सुविधांची काळजी घेण्यासाठी, विविध कामांसाठी रस्त्यावर होणाऱ्या फोडाफोडीवर नियंत्रण ठेवून रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून डक्ट पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लवकरच परिपत्रक जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
साळगांव उपकेंद्रापासून कळंगुट, साळगाव तसेच शिवोलीपर्यंत ३३ केव्ही भूमिगत वीज वाहिनीचे काम अशा तीन प्रकल्पांची पायाभरणी तसेच बागा येथील प्रस्तावित उपकेंद्राची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते बुधवारी कळंगुट पंचायत कार्यालयात एका कार्यक्रमातून करण्यात आली. सुमारे १०० कोटी हून ज्यास्त खर्च त्यावर अपेक्षित आहे.
कार्यक्रमाला आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, सरपंच जोझफ सिक्वेरा इतर सरपंच, खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस उपस्थित होते. सिक्वेरा यांनी स्वागतपर भाषणातून पंचायतीच्या वतिने करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली.
... म्हणून भाडेकरू नोंदणी
राज्यात वाढलेल्या गुन्हेगारी प्रकारावर चिंता व्यक्त करून गुन्हेगारी प्रकाराता बिगर गोमंतकिय ज्यास्त प्रमाणावर असल्याने हे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला भाडेकरूंची नोंदणी करण्याचे काम हाती घेणे भाग पडल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.