लोकांना पसंद पडले तर आग्राचा बटाटा आयात करणार- आमदार प्रेमेंद्र शेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 04:59 PM2023-12-20T16:59:01+5:302023-12-20T16:59:09+5:30

गाेव्यात प्रती दिन १०० टन बटाटे लागतात. यातील २५ टन प्रती दिन बटाटे हे फलाेत्पादन मंडळ  विक्री करत असते.

Will import potato from Agra if people like it - MLA Premendra Shet | लोकांना पसंद पडले तर आग्राचा बटाटा आयात करणार- आमदार प्रेमेंद्र शेट

लोकांना पसंद पडले तर आग्राचा बटाटा आयात करणार- आमदार प्रेमेंद्र शेट

- नारायण गावस

पणजी: गोव्यातील लाेकांना आग्राचा बटाटा पसंद पडला तसेच त्यांचा टिकाऊपणा चांगला असला तर आम्ही उत्तरप्रदेशमधील  बटाटे आयात करु शकतो, असे गाेवा फलोत्पादन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक व  विक्रेते यांच्या शिष्टमंडळाची  बैठक  गाेवा फलोत्पादन मंडळासोबत झाली यावेळी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

गाेव्यात प्रती दिन १०० टन बटाटे लागतात. यातील २५ टन प्रती दिन बटाटे हे फलाेत्पादन मंडळ  विक्री करत असते. आम्ही  बेळगाव कोल्हापूरहून बटाटे  आयात करत असतो. जर कमी दरात उत्तर प्रदेशमधील बटाटे मिळाले तर आम्हाला ाकमी दरात ते लोकांना विकता येणार आहे. याचा महामंडळाला फायदा होणार तसेच लोकांनाही कमी दरात मिळणार आहे. पण उत्तर  प्रदेशातील आग्राचा हा बटाटा खूप प्रसिद्ध आहे. पण ते  लवकर खराब होत असतात. तसेच ते थाेडे गाेड असल्याने ते गाेव्यातील लाेकांना पसंद पडणे गरजेचे आहे. त्यामुळे  अगोदर काही थाेडे बटाटे आयात करुन ते विक्री  केले जाणार जर लाेकांना ते परवडत असेल तर पुढे  खरेदी  केली जाणार  असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

Web Title: Will import potato from Agra if people like it - MLA Premendra Shet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा