शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर बीफ विक्रीला प्रोत्साहन देणार काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 22:30 IST

गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे.

पणजी: गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे. समितीचे निमंत्रक हनुमंत परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सर्व नियमांचा भंग करून गोव्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली बीफची बेकायदेशीर वाहतूक बंद पडली म्हणून गळा काढणारे हे बेकायदेशीर व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीफच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, त्यांचे पालन करणे सक्तीचे आहे. मांस प्रकल्पापासून विक्रीच्या स्थानापर्यंतची सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री माहिती असणे आवश्यक आहे. मारल्या जाणा-या जनावरांचे वय, आरोग्य, त्यांची वाहतूक करण्याची पद्धत, त्यासाठी मिळवावे लागणारे विविध परवाने. जनावरांची हत्त्या करण्याची पद्धत आणि नंतर मांस विक्रेत्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया या बद्दल सर्व काही स्पष्ट करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे न पाळता केलेले व्यवहार बेकायदेशीर ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी बेकायदेशीर बीफ व्यवराहाला प्रोत्साहन देण्याऐवजी आपल्या खात्याचे काम पाहावे. लोकांना ४० रुपये एक या दराने नारळ विकत घ्यावे लागत आहेत. ते ५ रुपये या दराने प्रत्येक कुटुंबाला किमान ३० तरी पुरविण्याचे काम त्यांनी केले तर त्याचा लोकांना अधिक फायदा होईल आणि नारळ त्यांचे निवडणूक चिन्ह असल्यामुळे त्यांनाही फायदा होईल असे ते म्हणाले.बेकायदेशीरपणे गोहत्त्या करणा-याला दोन लाख रुपये दंड व्हावा या मताचे असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकदा बैठकीत बोलताना सांगितले होते. आपल्याच विचारांचे त्यांनी स्मरण करावे म्हणजे निर्णय घेताना गोंधळ उडणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.गोमंतकीय मोठ्या प्रमाणावर बीफ खात असल्याचे चित्र राजकारणी करीत आहेत ते चुकीचे असल्याचा दावा परब यांनी केला. गोव्यात मोठ्या प्रमाणावर असलेला हिंदू समाज हा बीफ खात नाहीत. शिवाय अनेक ख्रिस्ती बांधवही बीफ खात नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात गोरक्षकांवर जीवघेणे हल्ले होतात आणि उलट गोरक्षकांनाच बदनाम करण्याचा घाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अमृत सिंग, शैलेंद्र वेलिंगकर, कमलेश बांदेकर आणि इतर नेते उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा