शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपाल, सभापतींना पत्र देऊ- ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 19:53 IST

लोकसभा निवडणुकीत मगोप काँग्रेसला पाठिंबा देणार

पणजी : राज्यातील भाजपप्रणीत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा निर्णय मगोपने घेतलेला आहे. फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. अंमलबजावणीसाठी राज्यपालांना व सभापतींना पत्र द्यावे लागते. ते पत्र लवकरच पक्षाकडून दिले जाईल, असे मगोपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी सांगितले.

मगोपचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी गेल्या 11 रोजी मगोपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली होती. उत्तर व दक्षिणेत लोकसभा निवडणुकीत मगो पक्ष काँग्रेसला पाठिंबा देईल, असे सावंत यांनी जाहीर केले व त्याची कार्यवाही मगोपने सुरू केली. मात्र मगोपने सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा ठराव बैठकीत घेतला काय असे पत्रकारांनी तेव्हा सावंत यांना विचारले असता, सावंत यांनी नकारार्थी उत्तर दिले होते. मगोपकडे ढवळीकर हे एकच आमदार आता असल्याने पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्न येत नाही. ढवळीकर भाजपप्रणीत आघाडी सरकारला मुद्द्यांनुसार पाठिंबा देतील किंवा विरोध करतील असे सावंत स्पष्टपणे म्हणाले होते. सावंत यांच्या बाजूला तेव्हा मगोपचे अनेक पदाधिकारी बसले होते. 

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय झाला आहे, असे शुक्रवारी सायंकाळी सांगितले. सुदिन ढवळीकर यांनीही शनिवारी तसेच भाष्य केले. सरकारचा पाठिंबा ठेवण्यात अर्थ नाही. मगोपचे कार्यकर्ते उत्तर व दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. मांद्रे मतदारसंघाबाबत दोन दिवसांत आमची रणनीती आम्ही जाहीर करू, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र मगो पक्षाने अजून सभापती किंवा राज्यपालांना दिलेले नाही, तेही दिले जाईल, असेही ढवळीकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस