शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करणारच; विरियातो फर्नांडिस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2024 09:56 IST

मडगाव येथे बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :काँग्रेस पक्षासाठी मडगाव मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आपण मडगावातून काँग्रेस कार्यकर्त्यांची पहिली बैठक घेऊन गाठीभेटी सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करण्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकद लावणार, तसेच जनतेने यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. मडगावचे आमदार कामत हे भाजपाला मोठी आघाडी मिळणार, असा दावा करीत होते; परंतु त्यांचा दावा फोल ठरला. उलट काँग्रेस पक्षाला मोठी आघाडी मिळाली. लवकरच मडगावातील सर्व गट बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मडगावातील विद्यमान आमदाराचा पराभव करणे सोपे जाईल, असे फर्नांडिस म्हणाले.

खासदार फर्नांडिस यांनी मडगावातील कार्यकर्त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे सावियो कुतिन्हो यांनी अभिनंदन केले. खासदार निधीतील मोठा वाटा मडगावसाठी राखून ठेवावा, असे आवाहन कुतिन्हो यांनी केले. मडगावातील जागा काँग्रेसची आहे. येथीस लोक काँग्रेस उमेदवारासोबतच आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवा