शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोवा के अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 12:52 IST

माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

- सुरेश गुदले पणजी - माझ्या गोव्याच भूमीत...गड्या नारळ दुधाचे....असे गोव्याचे वर्णन बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांंनी केले. तो गोवा आता राहिलेला नाही, जसे की कृष्णेकाठी कुं डल आता पहिले उरले नाही... त्यामुळे गोवा सोडून जावेसे वाटते, कारण गोवा पूर्वीसारखा राहिला नाही... गोवा हरवला...अशा आशयाचे एक गाणे पॉपस्टार रेमो फर्नांडीस यांनी गायले. झाले, यावरून कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी रेमो निराशावादी आहेत, त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे असे बोधामृत पाजलेले आहे. कलावंत गातो आणि राजसत्ता कसे गायचे ते शिकवते...मागील पानावरून पुढे चालूच आहे.कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी जगभर चिंतानजक स्थिती असल्याचे पुण्यात नुकत्याच झालेल्या पेनच्या अधिवेशनातही सामोरे आले. गोवा तर धर्मवाद्यांची गढी. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन केलेला आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण यांचे हित जपण्याची या पक्षाची टॅगलाईन होती. होती एवढ्याचसाठी की सध्या मायक्रोस्कोप घेऊन शोधले तरी या पक्षाच्या वाटचालीत ती सापडणार नाही. तांदूळ, मासे, पाव, नारळ यांसारखे गोवेकरांच्या दैनंदिन भोजनातील पदार्थ स्वस्त देण्याची घोषणा या पक्षाने निवडणुकीपूर्वी हवेत फेकून दिलेली होती. तीही मायक्रोस्कोपखाली सापडत नाही.गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण जपण्याची भावुक साद या पक्षाने घातलेली होती आणि पॉपस्टार रेमोने त्याची गाण्यातून नेमकी खिल्ली उडवलेली आहे. रेमो निराशावादी भाटकार (जमिनदार) आहेत. त्यांना असे वागणे शोभत नाही, असे या मंत्र्यांचे म्हणणे. सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर एकवेळ समजता येते पण रेमोची स्थिती अशी नाही, असा वकिली युक्तीवाद ते मांडतात.खरे तर कलावतांने तळागाळातल्याचा आवाज व्हायचे असते हेच मंत्रीमहोदय विसरताहेत आणि समष्टीऐवजी व्यक्तीवर येऊन थांबतात. यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नोकरभरतीची फाईल घेऊन दवाखान्यात बसलेले आहेत, असे यांच्याच सरकारमधील उपसभापती मायकल लोबो जाहीर म्हणतात. त्यामुळे तीन हजार सरकारी नोकरीभरती रखडलेली आहे असा लोबोंचा आरोप आहे. आणि मंत्री सरदेसाई म्हणतात, सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर समजता येते. समजता येते मंत्र्याची धन्य ती समज.खाणींनी गोव्याची वाट लावली. गोव्यातील जल, जंगल आणि जमिनीची वाट लावली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोवा म्हणजे बीच, बेबीज आणि बॉटल्स असे समीकरण घट्ट केलेली सर्व काळ््या धंद्याची समांतर व्यवस्था व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्यामुळे माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण