पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू  

By वासुदेव.पागी | Updated: November 29, 2023 16:49 IST2023-11-29T16:49:26+5:302023-11-29T16:49:46+5:30

फारुख आणि त्याचा भाऊ काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नव्या मांडवी पुलावरून चालत निघाले असता अचानाक त्याच्या फारुखने पुलाच्या कठड्यावर चढून मांडवीत उडी टाकल्याचे पोलिसांना सांगितले. 

While walking from the bridge, the brother jumped into Mandvi, the search began | पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू  

पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू  

पणजी : नव्या मांडवी पुलावरून मंगळवारी मध्यरात्री उसकई येथील फारुक उस्मान  या २७ वर्षीय तरुणाने उडी घेतली असून अग्निशामक दलाकडून त्याचा शोध सुरू आहे. फारुख आणि त्याचा भाऊ काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नव्या मांडवी पुलावरून चालत निघाले असता अचानाक त्याच्या फारुखने पुलाच्या कठड्यावर चढून मांडवीत उडी टाकल्याचे पोलिसांना सांगितले. 

या प्रकारानंतर भांभावून गेलेल्या भावाने पणजी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच अग्नीशमन दलालाही माहिती दिली. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास फारुखचा शोध सुरू केला. अग्निशामक जवानांनी स्थानिक मच्छीमारांच्या बोटींचा वापर करून त्यांन फारुखला शोधण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यंत फारुख काही मिळाला नव्हता. बुधवारी सकाळी पुन्हा शोथ सुरू करण्यात आला आहे. दरम्यान फारुखने उडी टाकण्यापूर्वी आपले चप्पल पुलावरच ठेवले होते. 

पणजी अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली  उपअधिकारी अनिल तळणकर, कृष्णा हळणकर, संकेत शेटकर, संतोश म्हापसेकर, महेश माईनकर व इतरांनी त्त्याचा दुपारीही शोध चालविला होता.
 

Web Title: While walking from the bridge, the brother jumped into Mandvi, the search began

टॅग्स :goaगोवा